चंदगड तालुका पत्रकार संघाचे पुरस्कार जाहीर, रौप्य महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त २७ रोजी सन्मान - चंदगड लाईव्ह न्युज

25 May 2023

चंदगड तालुका पत्रकार संघाचे पुरस्कार जाहीर, रौप्य महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त २७ रोजी सन्मान

 

चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

       मराठी पत्रकार परिषद मुंबई संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघ (रजि.) संघटनेच्या रौप्य महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त चंदगड तालुक्यातील विविध खात्यातील अधिकारी, कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, शेतकरी यांना तालुकास्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. शनिवार दि. २७ मे २०२३ रोजी सकाळी ११ वाजता तहसीलदार कार्यालय चंदगड येथील सभागृहात संपन्न होणाऱ्या कार्यक्रमात १० गुणवंतांसह विविध पुरस्कार, पदोन्नती प्राप्त, योग्य निवड, बदलीने आलेले अधिकारी, कर्मचारी, पत्रकार यांचे अभिनंदन व शुभेच्छा देण्यात येणार आहेत.

   पुरस्कार प्राप्त व्यक्तींमध्ये ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते- रघुवीर खंडोजी शेलार (पारगड), डॉ. बी. डी. सोमजाळ (वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र अडकूर तथा तालुका आरोग्य अधिकारी चंदगड), चंद्रकांत अरुण बोडरे (गटविकास अधिकारी चंदगड). सौ. जयश्री संजय पाटील (अंगणवाडी सेविका नागरदळे), सौ. अंजना सागर पाटील (आशा स्वयंसेविका कालकुंद्री), रियाज अब्दुल शेख (अध्यापक मराठी विद्या मंदिर माडवळे), आर. डी. पाटील (अध्यापक रामलिंग हायस्कूल व जुनिअर कॉलेज तुडिये),   तातोबा भिकाजी गावडा (पत्रकार अन्वेषण न्यूज मुगळी), तानाजी बाळू दळवी (प्रगतशील शेतकरी, लाकुरवाडी), सागर सर्जेराव पवार (वनरक्षक वन परीक्षेत्र कार्यालय चंदगड) यांचा समावेश असून शाल, श्रीफळ, गौरवचिन्ह व सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. याशिवाय चंदगड दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे न्यायाधीश ए. सी. बिराजदार,  सहन्यायाधीश चारुदत्त शिपकुले, सौ. माधुरी संतोष सावंत-भोसले (आदर्श सरपंच), सौ. अमृता चेतन शेरेगार (एलएलबी परीक्षा उत्तीर्ण), तहसीलदार राजेश चव्हाण (नूतन तहसीलदार), पोलीस निरीक्षक संतोष घोळवे (राज्य महिला आयोग सन्मानित), मुख्याध्यापक श्रीकांत वैजनाथ पाटील (महाराष्ट्र- गोवा लोक गौरव सेवा पुरस्कार सन्मानित), उदयकुमार देशपांडे (कृषी उत्पन्न बाजार समिती निवड), रावसाहेब कसेकर (सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक म्हणून पदोन्नती) आदी मान्यवरांचा विविध पुरस्कार, निवड, पदोन्नती बद्दल विशेष सन्मान करण्यात येणार आहे.
कार्यक्रमास न्यायाधीश ए. सी. बिराजदार, सहन्यायाधीश चारुदत्त शिपकुले, पोलीस निरीक्षक संतोष घोळवे, नूतन तहसीलदार राजेश चव्हाण, आदी मान्यवर उपस्थित राहणार असून प्रसिद्ध व्याख्याते अखलाक मुजावर हे प्रमुख वक्ते आहेत. पत्रकार संघाचे हितचिंतक व सर्वांनी वेळेत उपस्थित राहावे असे आवाहन चंदगड तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष नंदकुमार ढेरे, उपाध्यक्ष श्रीकांत पाटील, खजिनदार संपत पाटील, सचिव चेतन शेरेगार व सर्व सदस्यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment