१२ वी बोर्ड परिक्षेचा चंदगड तालूक्याचा ९२ . ५३ % निकाल, धनंजय विद्यालय अव्वल - चंदगड लाईव्ह न्युज

25 May 2023

१२ वी बोर्ड परिक्षेचा चंदगड तालूक्याचा ९२ . ५३ % निकाल, धनंजय विद्यालय अव्वल

 


तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा (एस. के. पाटील)
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या वतीने फेब्रुवारी -मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या १२ वी बोर्ड परिक्षेचा चंदगड तालूक्याचा ९२ . ५३ टक्के निकाल लागला .
 चंदगड तालूक्यातील १६ उच्च माध्यमिक विद्यालयातील २२९४ विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले होते . त्यापैकी २२१७ विद्यार्थ्यानी प्रत्यक्ष परिक्षा दिली . यामधील २१०७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले . धनंजय विद्यालय नागनवाडी च्या तीन्ही शाखांचा निकाल १०० % लागला . छ शिवाजी हायस्कूल व ज्यूनिअर कॉलेज माणगावचा सुद्धा १०० % लागला . तालूक्यातील ५२ विद्यार्थी डिस्टीगशन ' ग्रेड -A मध्ये २८४ , ग्रेड बी मध्ये १२९४ तर पास ग्रेड मध्ये ४७७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले . कोरोणा मुळे १० वी बोर्ड परिक्षा न देऊ शकलेले विद्यार्थी प्रथमच १२ वी बोर्ड परिक्षेला सामोरे गेल्याने याचा  परिणाम निकालावर झाला . सर्वच विद्यार्थ्यांना कमी गुण मिळाल्याचे या निकालावरून स्पष्ट झाले .
चंदगड तालूक्यातील १२ विचा कॉलेज निहाय निकाल

१) न . भू पाटील 
ज्यूनिजर कॉलेज चंदगड - कला - ७४ .४९ % विज्ञान - ९९ %, ०, वाणिज्य - ९८ . ८८ 
२ ) ज्यूनिअर कॉलेज कार्वे
कला - ९२ . ९२
विज्ञान - ८७ . ०४
वाणिज्य - ८८ . ७२ .
३ ) श्रीमान व्ही पी देसाई ज्यू कॉलेज कोवाड
विज्ञान - १००
कला - ७१
वाणिज्य - ९५ . ५८
४ ) गुरवर्य जी व्ही . पाटील  कॉलेज .
हलकर्णी
विज्ञान - १००
कला - ८९ . ६५
वाणिज्य - ९७ . ६४
५ ) श्री रामलिंग हाय . व ज्यूनिअर कॉलेज  तुडये
कला - ८८ . ५७
विज्ञान - ७६ . ९२
वाणिज्य - ९६ . 00
६ ) सरस्वती विद्यालय कालकुंद्री
विज्ञान -१००
कला - ७७ ७७
७) वाघमारे ज्यूनि कॉलेज ढोलगरवाडी
कला - ७० . ५ ८
 *८* ) धनंजय विद्यालय व ज्यूनिअर कॉलेज नागनवाडी
विज्ञान - १००
कला -१००
वाणिज्य - १००
९ ) बागीलगे - डूक्कूरवाडी कॉलेज
कला - ६४ . ७०
वाणिज्य - १००
१० ) श्री छ . शहाजी हाय . व ज्यूनिअर कॉलेज पाटणे
कला - ७३ . ९१ 
११ ) श्री शिवशक्ती हाय व ज्यूनिअर कॉलेज अडकूर
कला - ८८ . २३
१२ ) श्री छ . शिवाजी हाय व ज्यूनिअर 
कॉलेज माणगाव
कला - १००
१३ ) श्री रवळनाथ माध्य विद्यालय व ज्यूनिअर कॉलेज चंदगड
कला - ९२ . ८५
वाणिज्य -१००
१४ ) श्री शिद्धेश्वर हाय व ज्यूनि कॉलेज कुदनुर
कला - ८८ .८८
१५) राजश्री शाहू ज्यूनि कॉलेज शिनोळी बु.
विज्ञान -६६ .६६
१६ ) श्री सहयाद्री विद्यालय हेरे -
विज्ञान -१००
वाणिज्य -९६ .८७

आज निकाल . मिळवण्यासाठी सर्वत्र नेट कॅफे मध्ये गर्दी झाली होती . निकाल मिळताच विद्यार्थ्यांनी फटाके लावून आनंद व्यक्त केला . तर विद्यार्थ्यांना कमी मार्क मिळाल्याने पालक वर्गातून नाराजीचा सूर दिसून आला.

No comments:

Post a Comment