घुल्लेवाडी फाटा- मलतवाडी रस्त्याची चाळण; मनसे चा आंदोलनाचा इशारा - चंदगड लाईव्ह न्युज

24 May 2023

घुल्लेवाडी फाटा- मलतवाडी रस्त्याची चाळण; मनसे चा आंदोलनाचा इशारा

 

घुल्लेवाडी फाटा ते मलतवाडी १ किमी रस्त्याची खड्ड्यांमुळे झालेली दूरवस्था, वळीव पावसात येथे चिखलाचे साम्राज्य पसरले आहे.

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
      घुल्लेवाडी फाटा ते मलतवाडी रस्त्याची खड्ड्यांमुळे अक्षरशः चाळण झाली असून प्रवासी व वाहनधारक त्रस्त झाले आहेत. चंदगड  तालुक्याच्या पूर्व भागातील हा अत्यंत महत्त्वाचा रस्ता आहे असून पावसाळ्यापूर्वी या रस्त्याची डागडुजी न केल्यास रस्ता रोकोसह तीव्र आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिला आहे.
   कोवाड, कालकुंद्री, राजगोळी ते दड्डी परिसराला मलतवाडी, सांबरे, नेसरी, लकीकट्टे, अडकूर, अमरोळी भागाशी जोडणारा हा अत्यंत महत्त्वाचा व वर्दळीचा मार्ग आहे. मलतवाडी ते सांबरे तसेच मलतवाडी ते पोरेवाडी, मुगळी, अमरोळी हे दोन रस्ते झाल्यामुळे घुल्लेवाडी फाटा ते मलतवाडी रस्त्याला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. या अर्धा ते १ किलोमीटर रस्त्याची खड्ड्यांमुळे चाळण झाली आहे. पावसामुळे या खड्ड्यांत चिखल होऊन अपघातांना निमंत्रण मिळत आहे. गेल्या दोन दिवसातील वळीव पावसात अनेक दुचाकी स्वार पडून जखमी झाले असून गाड्यांचे नुकसान होत आहे. संभाव्य मोठे अपघात टाळण्यासाठी बांधकाम विभागाने गेली अनेक वर्षे दुर्लक्षित असलेल्या या रस्त्यात कडे लक्ष देऊन पावसाळापूर्वी दुरुस्ती करावी. अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष विवेक पाटील, तालुका सरचिटणीस तुकाराम पाटील यांच्यासह संभाजी मनवाडकर, विनायक वांद्रे, अमर प्रधान, अरुण कित्तुरकर, चेतन वांद्रे, भावकू नाईक आदी पदाधिकारी व मनसैनिकांनी दिला आहे.


No comments:

Post a Comment