आदर्श अंगणवाडी सेविका सौ. जयश्री संजय पाटील - चंदगड लाईव्ह न्युज

24 May 2023

आदर्श अंगणवाडी सेविका सौ. जयश्री संजय पाटील

 


कार्य - 

सौ. जयश्री संजय पाटील या ज्ञानदीप अंगणवाडी, क्रमांक २४८,नागरदळे ता. चंदगड येथे अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे माहेर हुंदळेवाडी व गाव नागरदळे आहे. BA BEd अशा उच्चशिक्षित असलेल्या जयश्री १५ फेब्रुवारी २०११ रोजी अंगणवाडी सेविका म्हणून रुजू झाल्या असून आत्तापर्यंत त्यांची १२ वर्षांपेक्षा अधिक सेवा पूर्ण झाली आहे. अंगणवाडीत दाखल बालकांचे पोषण व शिक्षण यांच्याकडे ममतेच्या भावनेने लक्ष पुरवून त्यांचा शारीरिक, मानसिक व भावनिक विकास करण्याबरोबरच शासनाकडून आलेली विविध प्रकारची सर्वेक्षणे आदी कामात त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे. कोविड-१९ च्या काळात हॉटस्पॉट सर्वेक्षण करणे, बाहेरून आलेल्या व्यक्तींना आरोग्य सुविधा पुरवणे, विलगीकरण करणे, पॉझिटिव्ह रुग्णांना वैद्यकीय व मानसिक आधार देण्याचे कार्य त्यांनी बजावले आहे. आपली अंगणवाडी व त्यात येणारी बालके तालुक्यात आदर्श ठराविक यासाठी त्यांचे प्रयत्न वाखाणण्याजोगे आहेत. त्यांच्या कार्याची दखल चंदगड तालुका पत्रकार संघाच्या वतीने घेऊन त्यांना मानाचा आदर्श अंगणवाडी सेविका पुरस्काराने सन्मानित करण्यात येत असून त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा.

No comments:

Post a Comment