कोवाड येथे १५ लाखांचे अंतर्गत रस्ता डांबरीकरण पूर्ण - चंदगड लाईव्ह न्युज

31 May 2023

कोवाड येथे १५ लाखांचे अंतर्गत रस्ता डांबरीकरण पूर्ण

डांबरीकरण पूर्ण झालेला कोवाड येथील कॉलेज रोड

कोवाड : सी. एल. वृत्तसेवा
   कोवाड (ता. चंदगड) येथील  दुर्गामाता मंदिर ते लक्ष्मी नगर पर्यंत (कॉलेज रोड) रस्ता डांबरीकरणाचे काम नुकतेच पूर्ण झाले. गावांतर्गत मूलभूत सुविधा निर्माण करणे योजनेअंतर्गत आमदार राजेश पाटील यांच्या फंडातून रु. १० लाख तर खासदार संजय मंडलिक यांच्या फंडातून रु. ५ लाख असा एकूण १५ लाख रुपये याकामी खर्च आला आहे. दुरावस्था झालेला हा रस्ता पावसाळापूर्वी पूर्ण झाल्यामुळे या रस्त्यावरून जाणारे प्राथमिक, माध्यमिक शाळा, ज्युनिअर कॉलेज मधील विद्यार्थी, व्यापारी व ग्रामस्थांतून समाधान व्यक्त होत आहे. खा. मंडलिक यांच्या शिफारशीतून  ग्रामविकास मंत्रालयाच्या माध्यमातून या रस्त्याची पूर्तता झाली. कोवाडचे  माजी उपसरपंच चंद्रकांत कुंभार,  अशोकराव देसाई आदींनी याकामी पाठपुरावा केला होता.


No comments:

Post a Comment