चंदगड तालुका पत्रकार संघाने समाजभान जपले - न्यायाधीश बिराजदार, चंदगड तालुका पत्रकार संघ रौप्यमहोत्सवी वर्धापन दिनी पुरस्कार वितरण - चंदगड लाईव्ह न्युज

29 May 2023

चंदगड तालुका पत्रकार संघाने समाजभान जपले - न्यायाधीश बिराजदार, चंदगड तालुका पत्रकार संघ रौप्यमहोत्सवी वर्धापन दिनी पुरस्कार वितरण

मराठी पत्रकार परिषद मुंबई संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाच्या रौप्य महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त पुरस्कार समाजातील गुणवंत व्यक्तींना पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. यावेळी पुरस्कारप्राप्त व्यक्ती व उपस्थित मान्यवर.

चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

         मराठी पत्रकार परिषद मुंबई संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाच्या रौप्य महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त तालुक्यातील विविध खात्यातील अधिकारी, कर्मचारी, समाजसेवक, पत्रकार, शेतकरी यांना तालुकास्तरीय पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले. शनिवार दि. २७ मे २०२३ रोजी तहसील कार्यालय चंदगडच्या सभागृहात संपन्न झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पत्रकार संघाचे अध्यक्ष नंदकुमार ढेरे होते. प्रमुख पाहुणे म्हणून न्यायाधीश ए. सी. बिराजदार, न्यायाधीश चारुदत्त शिपकुले, पोलिस निरीक्षक संतोष घोळवे, गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे, आरोग्य अधिकारी बी. डी. सोमजाळ उपस्थित होते. 

     

न्यायाधीश ए. सी. बिराजदार, पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांच्या हस्ते आदर्श कर्मचारी पुरस्कार स्वीकारताना वनरक्षक सागर पोवार.

        मान्यवरांच्या हस्ते आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या फोटो पूजनानंतर सी. एल. न्यूजचे संपादक संपत पाटील व चंदगड टाइम्सचे संपादक संतोष सावंत भोसले यांनी स्वागत केले. प्रास्ताविक संस्थापक अनिल धुपदाळे यांनी केले. 

      

आदर्श वैद्यकीय अधिकारी डॉ बी डी सोमजाळ (प्राथमिक आरोग्य केंद्र अडकूर)

     आदर्श पुरस्कार प्राप्त व्यक्तींत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते- रघुवीर खंडोजी शेलार (पारगड), आदर्श वैद्यकीय अधिकारी डॉ बी. डी. सोमजाळ (वैद्यकीय अधि. प्राआ. केंद्र अडकूर तथा तालुका आरोग्य अधिकारी चंदगड), आदर्श प्रशासकीय अधिकारी चंद्रकांत अरुण बोडरे (गटविकास अधिकारी चंदगड), आदर्श अंगणवाडी सेविका सौ जयश्री संजय पाटील (नागरदळे), आदर्श आशा स्वयंसेविका सौ. अंजना सागर पाटील  (कालकुंद्री), 

       

आदर्श प्रगतशील शेतकरी तानाजी बाळू दळवी (लाकूरवाडी)

    आदर्श प्राथमिक शिक्षक रियाज अब्दुल शेख ( वि. मं. माडवळे), आदर्श माध्यमिक शिक्षक आर. डी. पाटील (रामलिंग हायस्कूल व जुनिअर कॉलेज तुडिये), आदर्श पत्रकार तातोबा भिकाजी गावडा, पत्रकार अन्वेषण न्यूज (मुगळी), प्रगतशील शेतकरी तानाजी बाळू दळवी (लाकुरवाडी), आदर्श वनकर्मचारी सागर सर्जेराव पोवार (वनरक्षक वन परीक्षेत्र कार्यालय चंदगड) यांना कोल्हापुरी फेटा, शाल, श्रीफळ, गौरवपत्र व सन्मानचिन्ह देऊन  मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.               

ज्येष्ठ समाजसेवक रघुवीर खंडोजी शेलार पारगड यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार प्रदान करताना न्यायाधीश मा. ए सी बिराजदार पोलीस निरीक्षक संतोष घोळवे गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे पीडब्ल्यूडी अभियंता व्याख्याते मुजावर पत्रकार संघाचे अध्यक्ष नंदकुमार ढेरे, उपाध्यक्ष श्रीकांत पाटील, पत्रकार प्रकाश ऐनापुरे, संतोष सावंत भोसले, संपत पाटील, अनिल धुपदाळे आदी

        सहन्यायाधीश चारुदत्त शिपकुले, वनपाल दत्ता पाटील, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रावसाहेब कसेकर यांचा पदोन्नती बद्दल, सौ अमृता चेतन शेरेगार (एलएलबी परीक्षा उत्तीर्ण), पोलीस निरीक्षक संतोष घोळवे (राज्य महिला आयोग पुरस्कार), 

आदर्श अंगणवाडी सेविका जयश्री पाटील नागरदळे.
          मुख्याध्यापक श्रीकांत वैजनाथ पाटील (गोवा सरकारचा लोकगौरव सेवा पुरस्कार व शिवछत्रपती राष्ट्रीय एकात्मता फेलोशिप पुरस्कार), सौ. माधुरी संतोष सावंत-भोसले (आदर्श सरपंच पुरस्कार), उदयकुमार देशपांडे (कृषी उत्पन्न बाजार समिती निवड) झाले बद्दल तसेच राष्ट्रीय गिर्यारोहक व पारगड हेरिटेज रनचे प्रवर्तक प्रवीण चिरमुरे यांचाही विशेष सन्मान करण्यात आला. 

न्यायाधीश ए सी बिराजदार व गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे यांच्या हस्ते आदर्श प्राथमिक शिक्षक पुरस्कार स्वीकारताना रियाज अब्दुल शेख व कुटुंबीय, सोबत मान्यवर.

         यावेळी नूतन तहसीलदार राजेश चव्हाण यांचे स्वागत तर न्यायाधीश ए. सी. बिराजदार यांची पुणे येथे बदली झाल्याबद्दल पत्रकार संघ व पंचायत समितीच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या. 

आदर्श आशा स्वयंसेविका सौ अंजना सागर पाटील (कालकुंद्री)

          न्यायाधीश ए. सी. बिराजदार यावेळी बोलताना म्हणाले, ``बाळशास्त्री जांभेकर यांचा वारसा चालवताना चंदगड मधील पत्रकारांनी पत्रकारितेबरोबरच सामाजिक भान ठेवून राबवलेले अनेक उपक्रम राज्यातील पत्रकार व पत्रकार संघांना मार्गदर्शक ठरतील. 

आदर्श अंगणवाडी सेविका पुरस्कार स्वीकारताना सौ जयश्री संजय पाटील (नागरदळे), सोबत अंगणवाडी मदतनीस व मान्यवर.

           प्रमुख वक्ते  प्रसिद्ध व्याख्याते अखलाक मुजावर म्हणाले, ``चंदगड पत्रकार संघाने विविध वृत्तपत्रे, न्यूज चॅनलच्या माध्यमातून सामान्य जनतेच्या समस्या शासनाच्या निदर्शनास आणून दिल्या. अन्यायाला वाचा फोडली. चांगल्या व आदर्श गोष्टींना प्रसिद्धी दिली. दुष्काळ, अतिवृष्टी, वादळ, कोरोना आदी प्रसंगीचे वास्तववादी लेखन, संकट समयी गरजूंना मदत 

आदर्श प्रशासकीय अधिकारी चंद्रकांत बोडरे (गटविकास अधिकारी चंदगड)
       आदी कामांमुळे प्रभावित होऊन अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेने चंदगड पत्रकार संघाला 'राज्यस्तरीय आदर्श तालुका पत्रकार संघ पुरस्कार २०२०', तसेच राष्ट्रीय संस्कृती संमेलन मुंबई यांनी 

आदर्श शिक्षक पुरस्कार स्विकारताना आर. डी. पाटील.
           
        'राष्ट्रीय लोकप्रतिमा पुरस्कार २०२२' समाजसेवक पद्मश्री रविंद्र कोल्हे यांच्या हस्ते प्रदान करून सन्मान केला आहे. यातच चंदगड पत्रकार संघाचा आदर्श अधोरेखित होतो, असे गौरवोद्गार काढले. यावेळी पो. नि. संतोष घोळवे, गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे, उद्योजक सुनील काणेकर, न्या. चारुदत्त शिपकुले, डॉ. बी डी सोमजाळ, आदींची भाषणे झाली.

आदर्श पत्रकार तातोबा गावडा (मुगळी)
           यावेळी पत्रकार संघाचे सचिव चेतन शेरेगार, संतोष सुतार, जिल्हा कार्यकारणी सदस्य प्रकाश ऐनापुरे, महेश बसापुरे, सागर चौगुले, उत्तम पाटील, प्रदीप पाटील, संजय पाटील, संदीप तारीहाळकर, राजेंद्र शिवणगेकर, एस. के. पाटील आधी पत्रकार विविध शासकीय खात्यातील अधिकारी कर्मचारी हितचिंतक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन युवराज पाटील (कालकुंद्री) यांनी केले. पत्रकार संघाचे उपाध्यक्ष श्रीकांत पाटील यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment