![]() |
कु. श्रुती सरनोबत |
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
फेब्रुवारी व मार्च मध्ये घेण्यात आलेल्या बारावी बोर्ड परीक्षेत नागनवाडी (ता. चंदगड) येथील धनंजय ज्युनिअर कॉलेजच्या कला, वाणिज्य व विज्ञान शाखेचा निकाल १०० टक्के लागला. कला शाखेत अनुक्रमे कु. समृद्धी निलगे (83.67 टक्के), कु. मनिषा करंबळकर (73.83 टक्के), कु. दिपाली नाईक (72.67 टक्के), वाणिज्य शाखेत अनुक्रमे कु. श्रुती सरनोबत (92.17 टक्के), ओमकार पाटील (88.17), मधुश्री रेळेकर (86.50 टक्के).
विज्ञान शाखेत अनुक्रमे मधुरा पाटील (74.00 टक्के), अश्विनी बोकडे (71.83 टक्के) व शिवाजी यमेटकर (67.67 टक्के) यांनी अनुक्रमे प्रथम, द्वीतीय व तृतीय क्रमांक पटकावले. या परीक्षेमध्ये कॉलेजने १०० टक्के निकालांची परंपरा कायम राखली आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना संस्थेचे सेक्रेटरी जे. बी. पाटील व कॉलेजचे प्राचार्य एस. के. हरेर, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मार्गदर्शन लागले.
No comments:
Post a Comment