बारावी परीक्षेत कमी गुण मिळाल्याच्या नैराश्येतून विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या - चंदगड लाईव्ह न्युज

29 May 2023

बारावी परीक्षेत कमी गुण मिळाल्याच्या नैराश्येतून विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या

मनाली मधुकर सावंत

च‌ंदगड‌ / सी. एल. वृत्तसेवा

        बारावीच्या परीक्षेत कमी टक्केवारी मिळाल्याने नाराज झालेल्या विद्यार्थिनीने आपल्या घरातील तुळीला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना २७ मे २०२३ रोजी घडली. कु. मनाली मधुकर सावंत (वय वर्ष - १८, रा. हलकर्णी, ता. चंदगड, जि. कोल्हापूर) असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. मुलीचे वडील शिवाजीराव सावंत यांनी याबाबतची वर्दी चंदगड पोलिसात दिली.

   याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, मनाली ही बारावी विज्ञान शाखेत शिक्षण घेत होती. २५ मे ला लागलेल्या बारावी निकालामध्ये तीला कमी टक्के पडले. या नाराजीतून तिने घराच्या दुसऱ्या मजल्यावर तुळीला दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली. यावेळी तिची आई संगीता हिने तिला पायाकडून उचलून धरून आरडाओडा केला व शेजारील लोकांना बोलावून घेतले. तिच्या गळ्याभोवतीचा गळफास सोडवून तिला खाली उतरले. यावेळी ती बेशुद्ध अवस्थेत होती. तिला तातडीने उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटल बेळगाव येथे दाखल केले. मात्र उपचार सुरू असताना ती मयत झाली. तिच्या पश्चात आई, वडील, एक भाऊ असा परिवार आहे. तिच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. घटनेची नोंद चंदगड पोलिसात झाली असून पो. कॉ. महापुरे तपास करत आहेत.

No comments:

Post a Comment