आम्ही पर्यावरणप्रेमी मार्फत चंदगड तालुका परिसरातील पर्यावरण प्रेमींना आवाहन - चंदगड लाईव्ह न्युज

01 June 2023

आम्ही पर्यावरणप्रेमी मार्फत चंदगड तालुका परिसरातील पर्यावरण प्रेमींना आवाहन

 


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

       विविध वृक्षांच्या बिया जमा करून डोंगर माथ्यावरील हवाई पेरणी उपक्रमात सहभागी व्हावे यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

 पर्यावरणाचा समतोल सावरण्यासाठी प्रत्येकाने कर्तव्य बुद्धीने प्रयत्नशील असणे गरजेचे आहे. कारण आधी निसर्गाच्या सान्निध्यात राहून मानव हा नैसर्गिक जीवन जगत होता. मात्र आता तो दिवसेंदिवस निसर्गापासून दूर जात असून त्याचे जीवन कृत्रिम बनत चालले आहे. मानवाच्या निसर्गा विरुद्धच्या वर्तनाने जागतिक पर्यावरण धोक्यात आले आहे. यावर नुसत्या चर्चा करीत बसण्यापेक्षा प्रत्येकाने स्वतःपासून कर्तव्य बुद्धीने निसर्ग सेवेस सुरवात केली पाहिजे. आम्ही ती करत आहे. आपणही त्यात सहभागी व्हावे हे आवाहन करीत आहोत. 

      ५ जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून जगभर विविध उपक्रमानी साजरा केला जातो. चंदगड तालुका आम्ही पर्यावरणप्रेमी यांचे वतिने यादिवशी चंदगड परीसरातील डोंगर माथ्यावरून बियांची हवाई पेरणी केली जाते. पर्यावरणप्रेमींनी डोंगर माथ्यावर बियांची हवाई पेरणी करणेसाठी आपल्या परिसरात जंगली झाडे व फळझाडे यांच्या बिया जमा करून आमच्या कडे सुपूर्द कराव्यात.

      (ज्यामध्ये करंजा, धामण, जांभळ, बाभुळ, करंज, सागवान, हेळा (बेहडा), भोकर, गुळभेंडी, आवळा, काटेसावर, पळस पांगारा, रेनट्री, फणस, आंबा, पपई, धावडा, बहावा इत्यादी)

      आपणही या पर्यावरण दिनाच्या उपक्रमात सहभागी व्हावे असे जाहिर आवाहन आम्ही पर्यावरण ग्रुपचे संजय साबळे यांनी केले आहे.No comments:

Post a Comment