अडकुर-केरवडे येथील मोरींची कामे अर्धवट, पावसाळ्यात अपघाताची शक्यता, युवकांचा आंदोलनाचा इशारा - चंदगड लाईव्ह न्युज

18 June 2023

अडकुर-केरवडे येथील मोरींची कामे अर्धवट, पावसाळ्यात अपघाताची शक्यता, युवकांचा आंदोलनाचा इशारा

 


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

       गडहिंग्लज - चंदगड राजमार्गावर अडकूर व केरवडे दरम्यान असलेल्या अनेक महिने मोरीचे काम अर्धवट असलेने वाहन धारकांना प्रवास करताना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे पावसाळ्यात या अर्थवट मोरीवर अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे.

      चंदगड ते गडहिंग्लज पर्यंत सर्व मोरींची कामे पुर्ण झाली आहेत. फक्त अडकूर येथे रस्ता रुंदीकरणासह मोरीचे उंची वाढवण्याचा समावेश आहे. मग हे काम अर्धवट का? असा सवाल वाहनधारकांच्यातून होत असल्याने वाहन धारकांतून संताप व्यक्त होत आहे. मोरीची उंची वाढवून काम तातडीने पूर्ण करावे अन्यथा अडकूर येथे रस्ता रोको आंदोलन छेडण्याचा इशारा युवा नेते अजित देसाई, अडकूरचे सरपंच सचिन गुरव, सामाजिक कार्यकर्ते राजू कापसे, राजू दळवी, सजित आर्दाळकर, उत्साळीचे उपसरपंच खंडेराव देसाई, संतोष आर्दाळकर, बंडोपंत चंदगडकर, संदीप देसाई, विवेक रेगडे, प्रकाश इंगवले, ग्रामपचायत सदस्य शिवराज देसाई, सागर इंगवले, अभिजीत देसाई आदी कार्यकर्त्यांनी दिला आहे.

No comments:

Post a Comment