सुधीर मुतकेकर |
चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
पंचायत समिती चंदगडचे शिक्षण विस्तार अधिकारी सुधीर भावकू मुतकेकर (कुदनूर, ता. चंदगड) यांचा सेवानिवृत्ती सपत्नीक गौरव समारंभ शनिवार १७ जून २०२३ रोजी सकाळी ११.३० वाजता संपन्न होणार आहे. कोवाड (ता. चंदगड) येथील श्री मंगल कार्यालय तथा पद्मश्री रणजीत देसाई सांस्कृतिक भवन येथे गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे व गटशिक्षणाधिकारी सौ. सुमन सुभेदार यांच्या हस्ते होणाऱ्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य एस. एन. राजगोळकर असतील.
पदोन्नतीने दोन महिन्यापूर्वी दाटे बीटचे शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून पंचायत समिती चंदगड कडे रुजू झाले होते. सुधीर मुतकेकर यांची प्राथमिक शिक्षक म्हणून सेवा मराठी विद्यामंदिर किटवाड येथे १७ जानेवारी १९८६ रोजी सुरू झाली होती. त्यानंतर कुमार विद्यामंदिर कुदनूर, मराठी विद्या मंदिर कामेवाडी (पदवीधर म्हणून पदोन्नती). त्यानंतर राजगोळी खुर्द, तेरणी (ता. गडहिंग्लज), राजगोळी बुद्रुक नंतर चार वर्षांपूर्वी मलतवाडी शाळेत पात्र मुख्याध्यापक म्हणून पदोन्नती मिळाली. त्यांची एकूण सेवा सदतीस वर्षांपेक्षा अधिक झाली असून या काळात इंग्रजी विषयाचे एक उत्कृष्ट अध्यापक म्हणून त्यांनी विविध शाळांमध्ये आपल्या कामाचा ठसा उमटवला. मुख्याध्यापक म्हणूनही ते पालकांच्या स्मरणात राहतील.
सेवेच्या उत्तरार्धात त्यांना दोन महिन्यांसाठी का होईना शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून पदोन्नती मिळाली. हे त्यांच्या ३७ वर्षांच्या सेवेचे फळ म्हणावे लागेल. विद्यार्थी व शिक्षक वर्गात लोकप्रिय असलेल्या मुतकेकर यांना पालक वर्गातही आदराचे स्थान होते. शैक्षणिक क्षेत्रातील प्रदीर्घ सेवेतून निवृत्त होत असताना पंचायत समिती चंदगड, केंद्र कोवाड व दाटे बीटच्या वतीने सेवानिवृत्ती गौरव समारंभ आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून माजी जि. प. अध्यक्षा पुष्पमाला जाधव, माजी जि. प. सदस्य मल्लिकार्जुन मुगेरी, शंकरराव आंबेवाडकर, कल्लाप्पाण्णा भोगण, अनिता भोगण (सरपंच कोवाड), संगीता घाटगे (सरपंच कुदनूर), भारती सुतार (सरपंच मलतवाडी), अमर गारवे (सहाय्यक लेखाधिकारी पंचायत समिती चंदगड), राजू रेडेकर, पुंडलिक कोकितकर, लक्ष्मण कडोलकर, संदेश जाधव, केंद्रप्रमुख गोपाळ जगताप, बाळू प्रधान, विविध शिक्षक संघटना, पतसंस्था यांचे पदाधिकारी व मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन श्रीकांत वैजनाथ पाटील (केंद्र मुख्याध्यापक कोवाड), बी. एस. शिरगे (केंद्रप्रमुख कोवाड) प्रकाश पाटील (केंद्र मुख्याध्यापक दाटे), एस. के. पाटील (मुख्याध्यापक मलतवाडी), शाळा व्यवस्थापन समिती मलतवाडी तसेच केंद्र कोवाड व दाटे बीटच्या वतीने करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment