कार्यसम्राट आमदार राजेश पाटील यांचा वाढदिवस उत्साहात साजरा, हजारो कार्यकर्त्यांची उपस्थिती - चंदगड लाईव्ह न्युज

14 June 2023

कार्यसम्राट आमदार राजेश पाटील यांचा वाढदिवस उत्साहात साजरा, हजारो कार्यकर्त्यांची उपस्थिती

आमदार राजेश पाटील वाढदिवसानिमित्प कार्यकर्त्यांच्यासमोर बोलताना. 

महागाव/ सी. एल. वृत्तसेवा

     चंदगड विधानसभा मतदार संघाचे कार्य सम्राट आमदार राजेश नरसिंगराव पाटील यांचा ५६ वा वाढदिवस विविध उपक्रमानी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

   राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने महागाव येथील अनिकेत हॉलमध्ये आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला आमदार राजेश पाटील याना शुभेच्छा देण्यासाठी गडहिंग्लज, आजरा, चंदगडसह कर्नाटकच्या सिमा भागातील हजारो हितचिंतक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादीचे अध्यक्ष रामाप्पा करिगार होते.

        प्रास्ताविक जयसिंग चव्हाण यानी केले. प्रारंभी  राजेश पाटील (औरनाळ), प्रकाश पाटील, बाळू चौगुले, शिवानंद हूंबूरवाडी, संतोष पाटील, शिवप्रसाद तेली, संगिता पाटील, अल्बर्ट डिसोझा, अमर चव्हाण, अंजना रेडेकर, मुकूंद देसाई यांनी आपल्या मनोगतातून आमदार पाटील यांनी केलेल्या कोट्यावधी रुपयांच्या विकास कार्याचा गौरव केला. तर अमोल देसाई यांनी आमदार श्री. पाटील यांच्या विकास कामावर बनवलेली फील्म उपस्थितांना दाखविण्यात आली. यानंतर मान्यवरांच्या उपस्थितित आमदार पाटील यांना गुलाबाचा पुष्पहार घालून व केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. तसेच वाढ दिवसा निमित्य भेटवस्तू म्हणून मिळालेल्या शैक्षणिक साहित्याचे वितरण आमदार पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार पाटील यांनी यानी राष्टवादीचा हा बालेकिल्ला असाच अबाधित ठेवण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले. 

       आगामी निवडणूकीत महाविकास आघाडीची सत्ता आणायची आहे. तसेच अजित पवार यांना मुख्यमंत्री बनवण्याची कार्यकर्त्यांनी शपथ घ्यावी व या विभागात लाल दिव्याची गाडी आणावी असे मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाला गडहिंग्लज कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष अभय देसाई, गंगाधर व्हसकोटी, भिकू गावडे, मुन्नासो नाईकवाडी, दशरथ कुपेकर, एस. एल. पाटील यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्यने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment