समाज कार्यात सक्रिय होण्याचा माजी विद्यार्थी - विद्यार्थिनी केला संकल्प, किणीच्या जयप्रकाश विद्यालयात स्नेहमेळावा उत्साहात - चंदगड लाईव्ह न्युज

15 June 2023

समाज कार्यात सक्रिय होण्याचा माजी विद्यार्थी - विद्यार्थिनी केला संकल्प, किणीच्या जयप्रकाश विद्यालयात स्नेहमेळावा उत्साहात

किणीच्या जयप्रकाश विद्यालयात स्नेहमेळावा उत्साहात पार पडला.

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा 

         विद्यार्थी कितीही मोठे झाले तरी आपली शाळा, शिक्षक, बालपणीच्या गमती - जमती, खेळ केलेल्या खोडयांच्या आठवणी मनात घर करून असतात याचा प्रत्यय किणी येथील जयप्रकाश विद्यालयाच्या सन १९९०-९१ च्या १०वी च्या माजी विद्यार्थ्याच्या स्नेहमेळाव्यात आला.३२वर्षानंतर माजी विद्यार्थी, विद्यार्थीनी स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने एकत्र आले आणि जुन्या आठवणीत रममाण झाले. जुने नातेसंबंध नव्या विचाराने बांधण्यासाठी माजी विद्यार्थ्यांनी एकसंघ राहून सामाजिक कार्यात सक्रिय होणेचा निर्धार केला. ३२ वर्षानंतर एकत्र आलेले विद्यार्थ्याच्या स्नेहमेळाव्याच्या अध्यक्षस्थानी माजी मुख्याध्यापक सी. जे. देसाई होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला दिवंगत शिक्षक, शिपाई व माजी विद्यार्थी व विद्यार्थ्यांनींना श्रध्दाजंली वाहण्यात आली.  

        ग्रामविकास अधिकारी  श्रीधर भोगण यांनी प्रास्तविकात स्नेहमेळाव्याचा उद्देश व शाळेतील जुन्या स्मृतींना उजाळा दिला . यावेळी माजी विद्यार्थी यांचे स्वागत, दिप प्रज्वलन, माजी सर्व विद्यार्थी ओळख परिचय व सी.जे. देसाई , धामणेकर, बी. एल. हब्बुकर, बाबूराव जाधव ,अशोक भोगण, मारूती नांदुडकर, आर. एल. आंबेवाडकर, शिवाजी देवण, विद्यमान मुख्याध्यापक पांडूरंग मोहणगेकर या मान्यवर गुरूजनांचा सत्कार मानपत्र, श्रीफळ , शाल व पुष्पहार देवून करण्यात आला व गुरूचरण स्पर्श करण्यात आले.

        यावेळी माजी विद्यार्थी अमेरिका स्थायिक इंजिनीअर  गणेश मनवाडकर , गुरुनाथ शिंदे , सौ . सचिता बारस्कर , सौ . सुवर्णा नांदुडकर , रणजित सरदेसाई , सौ . भारती बामणे , बाबू पाटील , संजय पाटील ,बालू जोशिलकर , जिवन कुंभार या विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त केली . यावेळी बी . एल . हन्नुरकर यांनी अध्यात्मातून जिवनात आपण चांगले विचार कसे आत्मसात केले पाहिजेत या बाबत मार्गदर्शन केले. बाबूराव जाधव यांनी आपल्या मनोगतात जुन्या स्मृतींना उजाळा दिला व सर्व विद्यार्थ्याचे कौतुक केले. अध्यक्षीय भाषणात सी.जे. देसाई म्हणाले शाळेच्या जडणघडणीत व वाटचालीत शाळेतील माजी विद्यार्थ्याचे स्थान महत्वाचे असून माजी विद्यार्थ्या विविध क्षेत्रात कार्यरत असून यांनी शाळेचे नांव उज्वल केले. 

       या मेळाव्यामुळे एक नवी दिशा मिळणार असून समाजउपयोगी उपक्रम हाती घ्यावेत व आरोग्याकडे लक्ष द्यावे असा सल्ला दिला . यावेळी शाळेला पंखे भेट देणेत आला . माजी विद्यार्थ्यां सिने कलाकार जिवन कुंभार यांनी हरवलेले बालपण या काव्य पंक्तीव्दारे शाळेतील गुरुजनांनी शिकविलेल्या ज्ञान व संस्कार याची सुंदर कविता सादर केली . कवितेला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.यावेळी सौ भारती पाटील , सौ अनिता बिर्जे , सौ.मालुताई बिर्जे, सौ. सुनिता चौगुले, अजित बिर्जे ,निर्मल बिर्जे , जोतिर्लिंग बिर्जे, पुंडलिक बिर्जे, राजू माडूळकर, मारुती मणगुतकर, गुंडू जोशिलकर, शिवाजी आपटेकर, धनाजी देसाई, प्रभाकर देसाई, बाळू बोंद्रे ,सुरेश बेळगांवकर, सौ. महादेवी पाटील, सौ. रंजना हुंदळेवाडकर, अकबर शेख उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन दिलीप बिर्जे यांनी केले. तर आभार बाबूराव पाटील यांनी मानले.

No comments:

Post a Comment