वनकर्मचारी रामचंद्र मुळीक यांचा सेवानिवृत्तीबद्दल सत्कार - चंदगड लाईव्ह न्युज

15 June 2023

वनकर्मचारी रामचंद्र मुळीक यांचा सेवानिवृत्तीबद्दल सत्कार

चंदगड येथे वनसेवक रामचंद्र मुळीक यांचा सेवानिवृत्तीबद्दल सत्कार करताना जानबा कुंदेकर व कुंटूबिय

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा 

        चंदगड येथील परिक्षेत्र चंदगड वनाधिकारी कार्यालयात कार्यरत असलेले वनसेवक रामचंद्र नारायण मुळीक हे नियत वयोमानानुसार सेवा निवृत्त झाल्याबद्दल त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी परिक्षेत्रीय वन अधिकारी नंदकुमार भोसले होते. प्रास्ताविक वनपाल अनिल वाझे यांनी केले. यावेळी वनपाल कृष्णा डेळेकर, भोगोली सरपंच रामा गावडे, नारायण मुळीक यांनी मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या.

     यावेळी वनपाल दत्ता पाटील, नेताजी धामणेकर, संजय पाटील, जानबा कुंदेकर, ईस्माईल मुल्ला, रवी कसबले, मारूती मुळीक, पांडुरंग मुळीक, दिपक चौधरी, सागर मुळीक, कमलेश परब, दया मुळीक, प्रभत मुळीक, दशरथ गुरव, महादेव मुळीक, पंकज मुळीक, अंकुश कुंदेकर, बाळू तेजम आदी उपस्थित होते. आभार कृष्णा डेळेकर यांनी मानले.

No comments:

Post a Comment