पोलीस निरिक्षक संतोष घोळवे यांची 'सर्वोत्कृष्ट अपराधसिध्दी' या पुरस्काराकरिता निवड - चंदगड लाईव्ह न्युज

15 June 2023

पोलीस निरिक्षक संतोष घोळवे यांची 'सर्वोत्कृष्ट अपराधसिध्दी' या पुरस्काराकरिता निवड

 

पोलीस निरिक्षक संतोष घोळवे

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

       चंदगड तालुक्यात बदली होण्यापूर्वी पोलीस निरिक्षक संतोष घोळवे हे वडगांव पोलिस स्टेशनला पोलिस निरिक्षक म्हणून काम पहात होते. यावेळी त्यांनी वडगांव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पोक्सोच्या गुन्ह्यामध्ये गु. रजि. नं. ५९२ / २०२१, भा.दं.वि. कलम ३०२, ३७६, ३७६ (अ) (आय) (जे) (एम), ३६४ सह पोक्सो का.क२०१२-४,६,८, १०, १२ चा उत्कृष्ट तपास केला आहे. त्यांच्या या कामाची दखल घेवून त्यांना या गुन्ह्यात महाराष्ट्र राज्यात जून-२०२२ महिन्यासाठीच्या 'सर्वोत्कृष्ट अपराधसिध्दी' या पुरस्काराकरिता निवड करण्यात आली आहे. या प्रशंसनीय कामगिरी करिता त्यांना महाराष्ट्र राज्याचे पोलिस महासंचालक रजनीश शेठ यांच्याकडून प्रशस्तीपत्र देण्यात आले आहे. याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

No comments:

Post a Comment