कानुर खुर्द येथे हेरे सरंजाम कॅम्पचे शुक्रवारी धनंजय महाडिक यांच्या हस्ते उद्घाटन - चंदगड लाईव्ह न्युज

15 June 2023

कानुर खुर्द येथे हेरे सरंजाम कॅम्पचे शुक्रवारी धनंजय महाडिक यांच्या हस्ते उद्घाटन

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

     कानुर खुर्द (ता. चंदगड) येथे शुक्रवारी (ता. १६) सकाळी १०.३० वा. कानुर (खुर्द) येथे आयोजित केले आहे अशी माहिती चंदगड विधानसभा मतदारसंघाचे भाजपा नेते निवडणुक प्रमुख शिवाजीराव पाटील यांनी दिली. या कॅम्पमध्ये कानुर (खुर्द) सज्जामधील कानुर (खुर्द), सडेगुडवळे, भोगोली, पीळणी, पुंद्रा ही गावे येतात. या कॅम्पला सर्व शेतकरी बंधु-भगिनींनी आपले अर्ज जमा करावेत असे आवाहन शिवाजीराव पाटील यांनी केले आहे.

      या कॅम्पला खा. धनंजय महाडिक, माजी मंत्री भरमुआण्णा पाटील, तहसिलदार राजेश चव्हाण, भाजपाचे जिल्हा अध्यक्ष  समरजितसिंहराजे घाटगे, सर्कल अमर पाटील, तालुका अध्यक्ष नामदेव पाटील व भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

No comments:

Post a Comment