चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
चंदगड तालुक्यातील कार्यकाल संपत आलेल्या २२ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूकांसाठी प्रभाग आरक्षण सोडत २१ जुन २०२३ रोजी त्या-त्या ग्रामपंचायतीमध्ये घेण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार राजेश चव्हाण यांनी दिली.
प्रभाग रचना पूर्ण झालेल्या सडेगुडवळे कानूर खुर्द, आंबेवाडी, कोदाळी, आमरोळी, गणूचीवाडी, बुझवडे, कुरणी, माणगाव, लाकूरवाडी, तुर्केवाडी, मुरकुटेवाडी, शिरोली/सत्तेवाडी, उत्साळी, कलीवडे, मिरवेल, तांबूळवाडी, जट्टेवाडी, भोगोली, शिवनगे, कडलगे खुर्द, उमगाव या ग्रामपंचायतीसाठी अनुसूचित जाती, महिला, अनुसूचित जमाती महिला, नागरिकांचा मागास प्रवर्ग, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला व सर्वसाधारण महिला या वर्गासाठी आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे.
 
.jpg)

 
 
 
 
 
 
 
No comments:
Post a Comment