तिलारी प्रकल्पातील पाण्याचा चंदगड तालुक्यातील शेतकऱ्यांनी लाभ व्हावा, ठाकरे शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख प्रा. शिंत्रे यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन - चंदगड लाईव्ह न्युज

20 June 2023

तिलारी प्रकल्पातील पाण्याचा चंदगड तालुक्यातील शेतकऱ्यांनी लाभ व्हावा, ठाकरे शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख प्रा. शिंत्रे यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

 

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा (नंदकुमार ढेरे)

        महाराष्ट्र आणि गोवा या दोन राज्यांना उपयुक्त असलेल्या तिलारी अंतरराज्य पाठबंधारे प्रकल्पाच्या कालव्याच्या पुनरूज्जीवनासाठी ३३० कोटी रूपये खर्चास तिलारी आंतरराज्य धरण प्रकल्पाच्या नियंत्रण मंडळाच्या सहाव्या बैठकीत काल मुंबई येथे मंजुरी देण्यात आली. दिर्घकाळ रखडलेल्या एका प्रकल्पाचे काम मार्गी लागत दोन्ही राज्यातील शेतीच्या पाण्यासाठी कालव्यांचा प्रश्न मार्गी लागल्याने शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे.पण या प्रकल्पातील पाण्याचा लाभ पाण्यापासून वंचित असलेल्या चंदगड तालुक्यातील भागाला व्हावा अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे चंदगड विधानसभा सहसंपर्क प्रमुख प्रा.सुनिल शिंत्रे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कडे निवेदनाद्वारे केली आहे.

        तिलारी प्रकल्पाच्या कालव्याची कामे ३४वर्षापूर्वी झाली आहेत. गळती आणि अन्य कारणाने या कालव्यांच्या पुनरूज्जीवनाची आवश्यकता होती . या प्रकल्पातील १६ टीएमसी पाणी गोव्यासाठी तर ६ टिएमसी पाणी महाराष्ट्राला मिळते. गोव्यातील २१००० हेक्टर जमीनीला तर महाराष्ट्रातील ६००० हेक्टर जमीनीला याचा लाभ मिळणार आहे. या गोष्टी चांगल्या असल्यातरी ज्या चंदगड तालुक्यातील तिलारी हा प्रकल्प आहे. त्या तालुक्यातील शेतीसाठी या पाण्याचा किती उपयोग होणार आहे याचा तपशिल उपलब्ध झालेला नाही. चंदगड तालुक्यात जंगमहट्टी, फाटकवाडी यासह अनेक छोटे प्रकल्प पूर्ण झाले असले तरी अजुनही चंदगड तालुक्यातील बराच भाग पाण्याविना राहीला आहे. या प्रकल्पांच्या कालव्याची कामे पूर्ण करताना या पाण्याचा उपयोग स्थानिक चंदगड तालुक्यासाठी अधिकाधीक प्रमाणात कसा होईल यासाठी आराखडयात तरतूद होण्याची आवश्यकता आहे. याबाबत आपण खास लक्ष घालून तिलारी प्रकल्पातील पाण्याचा चंदगड तालुक्याला आधिकाधीक लाभ कसा होईल यासाठी संबंधीत खात्याला सूचना दयावी अशी मागणी प्रा. शिंत्रे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

       तिलारी धरणाच्या कालव्यांच्या पुनरुज्जीवनासाठी ३३० कोटींच्या खर्चाला काल दि.१६ जून रोजी महाराष्ट्र आणि गोव्याच्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या प्रकल्प नियंत्रण मंडळ बैठकीत मान्यता दिली. यामुळे दोन्ही राज्यांतील कालव्यांची दुरुस्ती, नूतनीकरण पूर्ण होणार आहे. तिलारी कालवा फुटीची डोकेदुखी यामुळे कमी होणार आहे . तिलारी धरण प्रकल्प महाराष्ट्र व गोव्याचा संयुक्त आहे. याच्या नियंत्रण मंडळाची सहावी बैठक सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे झाली. बैठकीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, उपमुख्यमंत्री तथा जलसंपदामंत्री देवेंद्र फडणवीस, गोव्याचे जलसंपदामंत्री सुभाष शिरोडकर आदी उपस्थित होते. या बैठक़ीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. तिलारी प्रकल्पाच्या कालव्यांची कामे ३४ वर्षांपूर्वी झाली आहेत. त्यामुळे जीर्ण आणि गळती होणाऱ्या डाव्या व उजव्या कालव्यांच्या पुनरुज्जीवनाबाबत बैठकीत एकमत झाले. त्यासाठी ३३० कोटींच्या खर्चास मान्यता दिली. 

असा आहे तिलारी प्रकल्प

         तिलारी आंतरराज्य प्रकल्पासाठी गोवा ७६.७० टक्के खर्च उचलते. या प्रकल्पाची २१.९ ३ टीएमसी इतकी क्षमता आहे. यातून गोव्यासाठी १६.१० . टीएमसी आणि उर्वरित ५.८३ टीएमसी महाराष्ट्राला पाणी मिळते. प्रकल्पामुळे गोव्यातील २१ हजार १ ९ ७ हेक्टर जमीन सिंचनाखाली येते , तर महाराष्ट्रातील ६ हजार ७७६ हेक्टरला सिंचन लाभ होतो. या प्रकल्पातून मुख्यत्वे उत्तर गोवा जिल्ह्यास पिण्याचे पाणी मिळते.


लांबी (किलोमीटरमध्ये) डावा तीर कालवा 

महाराष्ट्रातील लांबी १८.७७ ९  डावा तीर कालवा एकूण लांबी ५६.१ ९९ 

जोड कालवा महाराष्ट्रातील लांबी ३.५३ 

 बांदा शाखा कालवा एकूण लांबी ५७

No comments:

Post a Comment