चंदगड तालुका खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीचे बिगुल वाजले, कार्यक्रम जाहीर, २३ जूलै रोजी मतदान - चंदगड लाईव्ह न्युज

21 June 2023

चंदगड तालुका खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीचे बिगुल वाजले, कार्यक्रम जाहीर, २३ जूलै रोजी मतदान

 


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

        तुर्केवाडी (ता. चंदगड) येथील चंदगड तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाच्या २०२३ते २०२८ या पंचवार्षिक निवडणुकीसाठी कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. सोमवारी सहकार विभागाकडून हा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. १९ जुन २०२३ ते २४ जुलै २०२३ दरम्यान हा  निवडणुक कार्यक्रम आहे. एकूण १९ जागांसाठी ही निवडणूक होत आहे.

    संस्था सभासद प्रतिनिधी १०, व्यक्ती सभासद प्रतिनिधी ४, अनुसूचित जाती-जमाती १, विमुक्त जाती भटक्या जमाती १, इतर मागासवर्गीय प्रतिनिधी १, महिला प्रतिनिधी २ अशा एकूण १९ उमेदवारांचा यामध्ये समावेश आहे. 

     सोमवार दि. १९ ते शुक्रवार दि. २३ या पाच दिवसांत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मुदत आहे. मंगळवार दि.  २७ रोजी छाननी असून गुरुवार दि. २९ ते गुरुवार दि. १३ जुलैअखेर अर्ज माघारीसाठी मुदत आहे. १४जुलै रोजी उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप होईल तर रविवार दि. २३ जुलै रोजी मतदान होणार असून २४ रोजी मतमोजणी होणार आहे. दरम्यान या निवडणुकीसाठी जे पात्र सभासद आहेत. त्या सभासदांची अंतिम यादी ५ जून रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे.No comments:

Post a Comment