चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
केरवडे (ता. चंदगड) येथील कु.तेजश्री दत्तू गावडे हिने नीट( NEET) परीक्षेत ७२० पैकी ६७५ गुण मिळवून बेळगाव जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला. तिचे हे उल्लेखनीय यश आहे . केरवडेसारख्या ग्रामीण भागातील युवतीने नीटसारख्या देशपातळीवर महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या आणि अवघड असलेल्या परीक्षेत ६७५ गुण मिळवून चंदगड तालुक्याचा कर्नाटक राज्यात नावलौकीक वाढविला . तिच्या या यशाबद्दल चंदगड तालुक्यात अभिनंदन होत आहे.तिला प्राचार्य विश्वनाथ पाटील(बेळगाव), प्रा. निखिल तावटे (सोलापूर) प्रा. हेमंत जोशी (कराड) प्रा. सुमित छेटीजा (कोटा राजस्थान) प्रा. प्रतिभा पाठक (लखनौ उत्तरप्रदेश) व आई-वडिल यांचे मार्गदर्शन लाभले.
No comments:
Post a Comment