'शासन आपल्या दारी' कार्यक्रमाला चंदगड तालुक्यातील ३ हजार लाभार्थ्यी उपस्थित राहणार - चंदगड लाईव्ह न्युज

10 June 2023

'शासन आपल्या दारी' कार्यक्रमाला चंदगड तालुक्यातील ३ हजार लाभार्थ्यी उपस्थित राहणार


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

       ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी राहूल रेखावर यांनी चंदगड तालुक्यातील शासनाच्या सर्व विभाग प्रमुखांची बैठक जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या उपस्थितीत  तहसील कार्यालयात बैठक घेण्यात आली.यावेळी सर्व विभागाचा आढावा घेण्यात आला.

        प्रारंभी तहसीलदार राजेश चव्हाण यांनी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचे स्वागत केले. यावेळी ते म्हणाले की, तालुक्यातून एकूण ३४०० लाभार्थ्यांची निवड करण्यात आली असून त्यापैकी ३००० लाभार्थी जिल्ह्याच्या ठिकाणी नेण्यासाठी नियोजन केले असून यावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रत्येक ठिकाणी संपर्क अधिकाऱ्याची नियुक्ती केल्याचे सांगितले. तसेच लाभार्थ्यांना नेण्यासाठी एसटी महामंडळाच्या ६० बसेसची व्यवस्था केली आहे.

       आमदार राजेश पाटील यांनी यावेळी हेरे संरजामप्रश्न महसूल विभागाच्या हलगर्जीपणामुळे रेंगाळला आहे. १९ हजार हेक्टर क्षेत्र निर्गमित केली असून त्यापैकी ६ हजार २१ क्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी मंडल अधिकारी, तलाठी व वरिष्ठांची चालढकलपणाचे ढोंग नेमके कशासाठी असा नाराजीचा सूर जिल्हाधिकाऱ्यांसमोर आमदार पाटील यांनी व्यक्त केला. तसेच कोकणात जाणाऱ्या तळकट रस्त्याच्या कामाची आठवणही त्यांनी करून दिली. मान्सून लांबला तर १५ जूनपर्यंत राखीव पाणीसाठा सोडण्याचे नियोजन पाटबंधारे विभागाने करावे, जेणेकरून गावागावात पाणी प्रश्न उद्भणार नाही.यावेळी प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे, तहसीलदार राजेश चव्हाण, गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे, नायब तहसीलदार हेमंत कामत, निखिल डेसले,पोलिस निरीक्षक संतोष घोळवे यांच्यासह विविध खाते प्रमुख उपस्थित होते.

No comments:

Post a Comment