योग हाच सुखी व संपन्न जीवन बनवण्याचा राजमार्ग आहे - डॉ. सौ. माधूरी पाटील - चंदगड लाईव्ह न्युज

21 June 2023

योग हाच सुखी व संपन्न जीवन बनवण्याचा राजमार्ग आहे - डॉ. सौ. माधूरी पाटील

अडकूर येथे योग प्रात्यक्षिके दाखवताना डॉ. माधूरी पाटील

तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

       विज्ञान - तंत्रज्ञानाच्या या युगात पैशाच्या मागे धावताना मानव आरोग्याकडे दुर्लक्ष करतो आहे.  बालवयातच अनेक व्याधी जडत आहेत. या सर्वापासून दूर जाऊन सुखी आणि संपन्न जीवन जगायचे असेल तर योग हाच एकमेव पर्याय असल्याचे मनोगत संजिवन हॉस्पीटल अडकूरच्या डॉ. माधूरी पाटील यानी व्यक्त केले.

     २१ जून या जागतिक योग दिनानिमित्य अडकूर (ता. चंदगड) येथील श्री शिवशक्ती हायस्कूल व ज्यूनिअर कॉलेज मध्ये योग प्रात्यक्षिक व मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. माधूरी पाटील बोलत होत्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य व्ही. एन. सुर्यवंशी होते. यावेळी प्रास्ताविक एस. एन. पाटील यांनी केले. यावेळी डॉ. माधूरी पाटील यांनी सर्व विद्यार्थ्यांना दोन तास योगाच्या महत्वाबरोबरच प्रत्यक्ष योग प्रात्यक्षिके करून दाखवली. यामध्ये सर्व विद्यार्थी व शिक्षकानीही सहभाग घेतला. या कार्यक्रमाला एस. डी. पाटील, बंकट हिशेबकर, एस. के. पाटील, एस. एन. पाडले, पी. के. पाटील, डॉ. बी. आर. पाटील  आदि मान्यवर व विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन जे. व्ही. कांबळे यानी केले. तर आभार क्रीडा शिक्षक आय. वाय. गावडे यांनी मानले.

No comments:

Post a Comment