![]() |
यशवंत पाटील |
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
न्हावेली (ता. चंदगड) येथील जेष्ठ नागरिक यशवंत सावबा गावडे (वय वर्ष ९५)यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहें. त्यांच्या पश्चात दोन विवाहित मुलगे, एक मुलगी, सुना, नातवंड असा परिवार आहे.
कै. यशवंत पाटील यांनी न्हावेली गावचे माजी पोलीस पाटील पद व वाघदादेवी सोसायटीचे अध्यक्ष पद अनेक वर्ष भूषविले होते. हाडांच्या गंभीर आजारावर आयुर्वेदिक औषध देऊन अनेक रुग्णांना आजारातून बरे करण्यात त्यांचा हातखंडा होता. ते पत्रकार ज्ञानेश्वर पाटील व वाहतूकसेना तालुकाध्यक्ष संतोष पाटील यांचे आजोबा तर सामाजिक कार्यकर्ते अशोक पेडणेकर यांचे मामा होत.
No comments:
Post a Comment