हलकर्णी महाविद्यालयात योग दिन साजरा - चंदगड लाईव्ह न्युज

22 June 2023

हलकर्णी महाविद्यालयात योग दिन साजरा

 

हलकर्णी महाविद्यालयात योग दिन साजरा

चंदगड / प्रतिनिधि
हलकर्णी (ता. चंदगड) येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालय व गुरुवर्य गुरुनाथ विठ्ठल पाटील कनिष्ठ महाविद्यालय हलकर्णी अंतर्गत आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा करण्यात आला. एन.एस एस विभाग प्रमुख प्रा शाहू गावडे यांनी कार्यक्रमाची रूपरेषा प्रास्तविकातून विशद केली. शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी योगाच्या अनेक फायदयासाठी जागरूक निर्मान करण्यासाठी महाविद्यालयाच्या ग्रंथपाल व योगात विशेष प्राविण्य मिळालेल्या प्रा. सौ.वंदना केळकर यांनी विद्यार्थ्याच्या कडून योग व प्राणायामाचे विविध प्रकार करवून घेतले यावेळी प्रा.सी.एम तेली म्हणाले ' योग हा एक मन व शरीर सराव आहे . योगाचा उगम भारतात हजारो वर्षापूर्वी झाला यामध्ये शारीरिक मुद्रा श्वासोच्छासाचे व्यायाम आणि ध्यान यांचा मेळ आहे या कार्यक्रमासाठी प्रा . एच . के . गावडे , प्रा . आर . वी . गावडे , प्रा . सी . एम . तेली , प्रा . ए . व्ही . नौकुडकर , प्रा . एन . पी . पाटील , सौ . एस . डी . पाटील , अधिक्षक श्री . प्रशांत शेंडे आदी प्राद्यापक उपस्थित होते आभार प्रा जी जे गावडे यांनी मांडले.


No comments:

Post a Comment