आमरोळी विद्यालयात नांगनुरकर यांच्या वाढदिवसानिमित्त शैक्षणिक साहित्य वाटप - चंदगड लाईव्ह न्युज

23 June 2023

आमरोळी विद्यालयात नांगनुरकर यांच्या वाढदिवसानिमित्त शैक्षणिक साहित्य वाटप

 


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

        महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे राज्य उपाध्यक्ष व आमरोळी गावचे सुपूत्र भरमु नांगनूरकर यांच्या (२१ जून) रोजी झालेल्या वाढदिवसानिमित्त आमरोळी (ता. चंदगड) येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शाखेच्या वतीने भावेश्वरी माध्यमिक विद्यालयात विद्यार्थांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक व्ही. के. फगरे होते.राजू तुपारे, पाडुरंग मंडलिक, सौ. पाटील, विजय वाईंगडे आणि रमेश पाटील, किरण नाईक, रवींद्र नाईक, एकनाथ मोरे, कार्तिक सुतार यांच्या उपस्थितीत शालेय विद्यार्थ्यांना शालेयपयोगी साहित्य वाटप करण्यात आले. कर्मचारी अरुण गुरव आणि परसू कांबळे यांचे सहकार्य लाभले. सुत्रसंचालन सदानंद पाटील यांनी केले.

No comments:

Post a Comment