चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
जून महिना संपत आला तरी पाऊस पडत नसल्याने शेतकऱ्यासह सर्वच घटक पावसाची आतुरतेने वाट पाहत होते. पाणीसाठी कमी झाल्याने अनेक ठिकाणी टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. तर अनेक ठिकाणी पाणी कपात केली जात आहे. तसेच पेरण्या रखडल्याने शेतकरी चिंतेत आहे. मात्र आज दुपारनंतर हलक्या स्वरुपाचा पाऊस झाल्याने यापुढे तरी पाऊस होईल अशी आशा शेतकऱ्यांना आहे. त्यामुळे त्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. तसेच रोजच सकाळी किंवा दुपारी ढग दाटून येते होते. मात्र पाऊस पडत नव्हता. आज सकाळपासून पावसाचे वातावरण दिसत होते. दुपारनंतर पंधरा मिनिटे पाऊस झाला. या पावसामुळे उष्म्याने हैराण झालेल्या नागरीकांना थोडासा दिलासा मिळाला आहे. तसेच उद्यादेखील पाऊस झाल्यास पेरणीसाठी हा पाऊस उपयुक्त ठरणार आहे. यापुढे येणाऱ्या दिवसामध्ये पाऊस नियमित असावा असा आशावाद शेतकरी वर्गातून आहे.
No comments:
Post a Comment