तुर्केवाडी येथील चंदगड तालुका खरेदी विक्री संघ निवडणुकीसाठी अखेरच्या दिवशी सत्ताधाऱ्यांसह विरोधकांचे ४१ अर्ज दाखल - चंदगड लाईव्ह न्युज

23 June 2023

तुर्केवाडी येथील चंदगड तालुका खरेदी विक्री संघ निवडणुकीसाठी अखेरच्या दिवशी सत्ताधाऱ्यांसह विरोधकांचे ४१ अर्ज दाखल

 


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

        तुर्केवाडी (ता. चंदगड) येथील चंदगड तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाच्या २०२३ते २०२८ या पंचवार्षिक निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी ४१ अर्ज दाखल झाले. निवडणुक कार्यक्रम जाहीर होऊन पाच दिवस झाले. पण एकही दाखल झाला नव्हता पण आज अखेरच्या दिवशी सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनीही अर्ज दाखल केले. संस्था गटातून १६, व्यक्तिगत गटातून १३, अनु. जाती जमाती गटातून २, विमुक्त जाती जमाती गटातून ३, इतर मागास गटातून ५, तर महिला गटातून फक्त २ अर्ज दाखल  झाले आहेत. एकूण १९ जागांसाठी ही निवडणूक होत आहे.संस्था सभासद प्रतिनिधी १०, व्यक्ती सभासद प्रतिनिधी ४, अनुसूचित जाती-जमाती १, विमुक्त जाती भटक्या जमाती १, इतर मागासवर्गीय प्रतिनिधी १, महिला प्रतिनिधी २ अशा एकूण १९ उमेदवारांचा यामध्ये समावेश आहे. 

      मंगळवार दि. २७ रोजी छाननी असून गुरुवार दि. २९ ते गुरुवार दि. १३ जुलैअखेर अर्ज माघारीसाठी मुदत आहे. १४ जुलै रोजी उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप होईल तर रविवार दि. २३ जुलै रोजी मतदान होणार असून २४ रोजी मतमोजणी होणार आहे.No comments:

Post a Comment