जेलुगडे प्राथमिक शाळेत शिक्षक द्या, ग्रामस्थांची निवेदनातून गटविकास अधिकाऱ्यांकडे मागणी - चंदगड लाईव्ह न्युज

23 June 2023

जेलुगडे प्राथमिक शाळेत शिक्षक द्या, ग्रामस्थांची निवेदनातून गटविकास अधिकाऱ्यांकडे मागणी

गटविकास अधिकारी यांना निवेदन देताना जेलुगडे ग्रामस्थ.

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

       मराठी विद्या मंदिर जेलुगडे या शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या ७० आहे. आतापर्यंत येथे २ शिक्षक कार्यरत होते. पण यातील एक शिक्षकाची बदल झाल्याने आता एकच शिक्षक आहे. त्यामुळे एका शिक्षकावर अतिरिक्त ताण पडत असून विद्यार्थांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे जेलुगडे प्राथमिक शाळेत आणखी किमान २ शिक्षक द्यावेत. या मागणीचे निवेदन जेलुगडे ग्रामस्थांनी गटविकास अधिकारी चंद्रकांत बोंडरे व गटशिक्षणाधिकारी सुमन सुभेदार यांच्याकडे निवेदनातून केली आहे. 

         या प्रसंगी  शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अंकुश प्रधान, उपाध्यक्ष सुधाकर बांदिवडेकर, सदस्य भैरवनाथ गावडे, सदानंद गावडे, सूर्यकांत बांदिवडेकर, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्या माऊली राजाराम गावडे, मनीषा जोतिबा गावडे, अर्चना गणपत देवळी, सुभाष नाईक, दशरथ कांबळे आदिसह ग्रामस्थ उपस्थित होते. 

No comments:

Post a Comment