चंदगड लाईव्ह : न्यूज नेटवर्क
प्रेम हे आंधळ असत, ते म्हणतात हे काही खोटं नाही. हे दाखवणारी एक घटना घडली आहे, बिहारमध्ये !
बिहारमधून एक अजब प्रेमाची गजब कहाणी समोर आली आहे. ही प्रेम कहाणी ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. काही लोकांनी याला मॉडर्न प्रेम काहाणी देखील म्हटले आहे. सध्या ही घटना सर्वत्र चर्चेचा विषय ठरली आहे. बिहारमधील खगरिया येथे ही घटना घडली आहे.
बिहारमधील दोन महिलांचे चक्क एकमेकांच्या पतींवर प्रेम जडलं, एवढेच नाही तर प्रेमाला न्याय देत दोन्ही जोडप्यांनी एकमेकांसोबत लग्नही केले. धक्कादायक बाब म्हणजे यात एकाला चार तर दुसऱ्याला दोन मुलं आहेत. दोन्ही महिला एकमेकींच्या नवऱ्याच्या प्रेमात पडल्या होत्या. यानंतर दोघांनी नवऱ्याची अदलाबदल करून मंदिरात लग्न केले.
स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, हरदिया गावातील रहिवासी असलेल्या नीरजचे लग्न 2009 मध्ये पसरहा गावात रुबी देवीसोबत झाले होते. दरम्यान, त्याला चार मुलं देखील आहेत. जानेवारी 2022 मध्ये रुबी पसरा गावात राहणाऱ्या मुकेश कुमारच्या प्रेमात पडली. मुकेश देखील विवाहित असून त्याला दोन मुले आहेत. काही दिवसांनी दोघांनी लग्न केले.
No comments:
Post a Comment