सुधीर मुतकेकर यांचा सेवानिवृत्ती निमित्त सन्मान करून शुभेच्छा देताना विविध संघटनांचे पदाधिकारी, मान्यवर, केंद्र कोवाड व दाटे येथील शिक्षक, शिक्षिका
चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
पंचायत समिती चंदगड बीट दाटेचे शिक्षण विस्तार अधिकारी सुधीर भावकू मुतकेकर (कुदनूर, ता. चंदगड) यांचा सेवानिवृत्ती निमित्त गौरव सोहळा पद्मश्री रणजीत देसाई सांस्कृतिक भवन कोवाड (ता. चंदगड) येथे नुकताच पार पडला. निवृत्त प्राचार्य एस. एन. राजगोळकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात माजी जि. प. अध्यक्षांसह चार माजी जि. प. सदस्यांच्या हस्ते मुतकेकर यांचा सपत्नीक गौरव करण्यात आला.
छ. शिवाजी महाराज व लोकराजा शाहू यांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. कोवाडचे केंद्र मुख्याध्यापक श्रीकांत पाटील व केंद्रप्रमुख बी. एस. शिरगे यांनी स्वागत केले. प्रास्ताविक करताना विठोबा मंगुरकर यांनी मुतकेकर यांच्या ३७ वर्षांच्या सेवेतील कार्याचा आढावा घेतला. सुधीर मुतकेकर यांची प्राथमिक शिक्षक म्हणून सेवा मराठी विद्यामंदिर किटवाड येथे १७ जानेवारी १९८६ रोजी सुरू झाली. त्यानंतर कुमार विद्यामंदिर कुदनूर, मराठी विद्या मंदिर कामेवाडी (पदवीधर), राजगोळी खुर्द, तेरणी (ता. गडहिंग्लज), राजगोळी बुद्रुक, मलतवाडी शाळेत मुख्याध्यापक म्हणून तर शेवटी शिक्षण विस्ताराधिकारी म्हणून पदोन्नती मिळाली. इंग्रजी विषयाचे एक निष्णात अध्यापक म्हणून त्यांनी विविध शाळांमध्ये आपल्या कामाचा ठसा उमटवला. सेवानिवृत्ती सन्मान सोहळ्यात कोल्हापूर जि. प. च्या माजी अध्यक्षा पुष्पमाला जाधव, माजी जि. प. सदस्य मल्लिकार्जुन मुगेरी, शंकरराव आंबेवाडकर, कल्लाप्पाण्णा भोगण यांनी भाषणातून त्यांच्या कार्याचे कौतुक केले. यासह अमर गारवे (सहाय्यक लेखाधिकारी), शिक्षक संघटना पदाधिकारी शिवाजी पाटील, एन. व्ही. पाटील, धनाजी पाटील, सदानंद पाटील, मुतकेकर यांची कन्या सौ. प्रयुजा गवस, सायली धुरे आदींनी भाषणे केली. यावेळी संगीता घाटगे (सरपंच कुदनूर), भारती सुतार (सरपंच मलतवाडी), लक्ष्मण कडोलकर, संदेश जाधव, रामा यादव, प्रकाश वि. पाटील, वसंत जोशीलकर, नारायण जा. पाटील, सुभाष ल. पाटील, मुतकेकर यांचे नातेवाईक शिवाजी धुरे, मालोजी जाधव, विलास पाटील, कन्या सौ अनुजा दिनकर पाटील आदींसह मलतवाडी व कुदनूर ग्रामस्थ, विद्यार्थी, चंदगड व गडहिंग्लज तालुक्यातील शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आप्पाजी रेडेकर यांनी सूत्रसंचालन केले. यादू मोदगेकर यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment