चंदगड तालुक्यातील प्राथमिक शाळांतील शिक्षकांची रिक्त पदे त्वरित भरण्यात,अनथा मुलाना शाळेत पाठवणार नाही.पालकांचे गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन - चंदगड लाईव्ह न्युज

22 June 2023

चंदगड तालुक्यातील प्राथमिक शाळांतील शिक्षकांची रिक्त पदे त्वरित भरण्यात,अनथा मुलाना शाळेत पाठवणार नाही.पालकांचे गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन

चंदगड तालुक्यातील प्राथमिक शाळांतील शिक्षकांची रिक्त पदे करण्यासाठी पालकांचे गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

चंदगड तालुक्यातील प्राथमिक शाळांमध्ये अपुऱ्या शिक्षकांमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. यावर्षी तरी रिक्त पदे भरावीत तरच पाल्यांना शाळेत पाठवू असा पवित्रा पालकांनी तसेच शालेय व्यवस्थापण समितींनी घेतला आहे. प्रशासनाने याची दखल न घेेेतल्यास घेतल्यास जिल्हा परिषदेसमोर आंदोलन करण्याचा इशारा तालुक्यातील शाळा व्यवस्थापन समिती शिष्टमंडळाने दिला आहे. 

    मंगळवारी गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे, गटशिक्षणाधिकारी सुमन सुभेदार यांना निवेदन दिले आहे.तालुक्यात प्राथमिक शिक्षण विभागात सुमारे १५० पद रिक्त आहेत. याचा फटका विद्यार्थ्यांना बसत असल्याने आक्रमक झालेल्या शाळा व्यवस्थापन समिती शिष्टमंडळाने 1 जुलैपर्यंत रिक्त पदे न भरल्यास तालुक्यातील संपूर्ण शाळाच बंद ठेवण्याचा इशारा यावेळी दिला.अधिकाऱ्यांनी आपली मुले जि.प. शाळेतच पाठवावीत स्थानिक स्वराज्य संस्थांतील अधिकारी व शासकीय सेवकांची मुले पालकांनी जिल्हा परिषद शाळेतच पाठवावीत,निर्लेखन झालेल्या शाळा इमारतीची कामे त्वरित सुरू करावीत, शिक्षण स्वंयसेवक हा उपक्रम राबवून अप्रत्यक्षरित्या खाजगीकरणाला शासन बळ देत असून ते बंद करून नियमित शिक्षक भरावेत,अशी मागणी निवेदनातून केली आहे.‌यावेळी नितीन पाटील,एकनाथ कांबळे, जयश्री हारकारे, रुपेश कांबळे, रामा यादव, जितेंद्र मुळीक, नारायण बागवे, सुरेखा तिबले, सविता पवार,अश्विनी आमृसकर यांच्यासह १०० हून अधिक शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकारी उपस्थित होते.


No comments:

Post a Comment