शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकाऱ्यांची २१ रोजी चंदगड येथे बैठक - चंदगड लाईव्ह न्युज

18 June 2023

शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकाऱ्यांची २१ रोजी चंदगड येथे बैठक

 चंदगड / सी. एल. वृत्तसेवा 

          चंदगड तालुक्यातील शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकाऱ्यांची बैठक  बुधवार (दि. २१) रोजी सकाळी ११ वाजता चंदगड येथील पंचायत समिती कार्यालयात बोलावण्यात आली आहे. बुधवारी गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे व गटशिक्षणाधिकारी सुमन सुभेदार यांच्याशी तालुक्यातील प्राथमिक शिक्षण विभागातील रिक्त पदांविषयी, त्यावरील उपाययोजना, तसेच विविध शाळांतील अडचणींवर चर्चा करण्यासाठी ही बैठक बोलावली आहे.

      तालुक्यातील सर्व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, सदस्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन हलकर्णी येथील माजी सरपंच व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष एकनाथ कांबळे यांनी केले.

No comments:

Post a Comment