नेसरी येथे अंगणवाडी क्रमांक १८३ च्या नूतन इमारतीचे उद्घाटन - चंदगड लाईव्ह न्युज

30 June 2023

नेसरी येथे अंगणवाडी क्रमांक १८३ च्या नूतन इमारतीचे उद्घाटन

नेसरी येथील अंगणवाडी क्रमांक १८३ च्या नूतन इमारतीचे उद्घाटन प्रसंगी उपस्थित मान्यवर.

नेसरी / सी. एल. वृत्तसेवा

      कोल्हापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या सहकार्याने  तसेच पंचायत समिती मा. उपसभापती विद्याधर गुरबे यांच्या प्रयत्नाने तसेच सर्व अंगणवाडी सेविका व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य रामचंद्र परीट यांच्या प्रयत्नाने जिल्हा नियोजन मंडळाच्या निधीतून  मंजूर झालेल्या नवीन अंगणवाडी इमारतीचे उद्घाटन नेसरी गावच्या लोकनियुक्त सरपंच सौ. गिरीजादेवी सग्रांमसिंह शिदें-नेसरीकर  यांच्या हस्ते झाले. 

       तसेच पंचायत समितीचे उपसभापती विद्याधर गुरबे यांच्या शुभहस्ते फित  कापण्यात आली.  यावेळी उपस्थित नेसरीचे उपसरपंच कु. प्रथमेश दळवी, काशिबाई शिक्षण समितीचे अध्यक्ष भिकाजी दळवी, माजी सरपंच आशिष साखरे, माजी उपसरपंच अमर हिडदुगी, नेसरी बिटच्या सुपर व्हायजर तुप्पे सागर नांदवडेकर, बबन पाटील सर्व ग्रामपंचायत सदस्य व सदस्या, नेसरीचे ग्रामविकास अधिकारी शशिकांत कुंभार, सर्व अंगणवाडी सेविका, मदतनीस ठेकेदार, पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.

No comments:

Post a Comment