डॉ. अरविद पठाणे यांचा सेवानिवृत्तीबद्दल सत्कार, एकाच ठिकाणी २४ वर्ष सेवा - चंदगड लाईव्ह न्युज

30 June 2023

डॉ. अरविद पठाणे यांचा सेवानिवृत्तीबद्दल सत्कार, एकाच ठिकाणी २४ वर्ष सेवा

माणगाव (ता. चंदगड) येथील आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अरविद पठाणे यांचा सेवानिवृत्तीबद्दल सत्कार करताना अनिल सुरूतकर, गजानन कुंभार व आरोग्य केंद्रातील कर्मचारी

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

     माणगांव (ता. चंदगड) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अरविद पठाणे माणगावच्या  आरोग्य केंद्रात सलग २४ वर्षे सेवा बजावून नुकतेच निवृत्त झाले. यानिमित्त त्यांचा आरोग्य केंद्रातील कर्मचारी व नागरिकांकडून यथोचित सत्कार करण्यात आला. अध्थक्षस्थानी सरपंच अश्विनी जयवंत कांबळे होत्या. माजी पंचायत समिती सदस्य अनिल सुरूतकर यांनी स्वागत केले. आपल्या कार्यकाळात डॉ. पठाणे यांनी सामान्यांना प्रामाणिक सेवा देत कामकाज केल्याबद्दल मान्यवरांनी आपल्या भाषणात समाधान व्यक्त केले. तर माणगाव आरोग्य केंद्रात काम करत असताना पंचक्रोशीतील नागरिकांकडून नेहमीच आपल्याला आदराची वागणूक मिळाली. त्यामुळेच या ठिकाणी कारकीर्दीतील २४ वर्षे कधी संपली हे समजले देखील नसल्याची प्रतिक्रिया डॉ. पठाणे यांनी सत्काराला उत्तर देताना व्यक्त केली. यावेळी माजी शिक्षण अधिकारी एम. टी. काबंळे, डॉ. एस. व्ही. काबंळे, डॉ. ए. बी. नाईकवाडी यांनी मनोगत व्यक्त केली.

   यावेळी डाॅ. पराग जोशी, डॉ. डॉ. बी. के. कांबळे, डॉ. सुधाकर पाटील, डाॅ. सचिन गुडंप, माजी सरपंच गजानन कुंभार, बिभिसेन लाठे, मनोहर पाटील यांच्यासह आरोग्य केंद्रातील कर्मचारी, आशा वर्कस, नागरिक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment