तेऊरवाडीच्या सचिन पाटील यांना शिवाजी विद्यापिठाची पीएचडी प्रदान - चंदगड लाईव्ह न्युज

01 July 2023

तेऊरवाडीच्या सचिन पाटील यांना शिवाजी विद्यापिठाची पीएचडी प्रदान

 


तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

       तेऊरवाडी (ता. चंदगड) येथील सचिन महादेव पाटील यांना शिवाजी विद्यापिठ कोल्हापूरची संख्याशास्त्र विषयातील पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली.

     'ऑन मल्टीसँम्पल टेस्ट इन द प्रेझेन्स ऑफ न्यून्स पॅरामिटर्स' या विषयाचा शोध प्रबंध डॉ. सचिन यांनी विद्यापीठाला सादर केला होता. डॉ. सचिन यांना  शिवाजी विद्या पिठाच्या संख्याशास्र विभागाच्या प्रमुख प्रा. डॉ. एच. व्ही. कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितित उच्च पदवी मिळवल्याबद्दल डॉ. सचिनचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.No comments:

Post a Comment