राज्यस्तरीय योगा पंच परीक्षेत अडकूरच्या डॉ. माधुरी पाटील यांचे उज्वल यश - चंदगड लाईव्ह न्युज

01 July 2023

राज्यस्तरीय योगा पंच परीक्षेत अडकूरच्या डॉ. माधुरी पाटील यांचे उज्वल यश

 

डॉ. माधूरी पाटील

तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

     वाई (जिल्हा सातारा) येथे झालेल्या राज्यस्तरीय योगा पंच परीक्षेमध्ये अडकूर (ता. चंदगड) येथील संजिवन हॉस्पीटलच्या डॉ. माधूरी बी. पाटील यानी उज्वल यश संपादन केले. आज या परीक्षेचा निकाल जाहिर करण्यात आल्याची माहिती योगा संघटनेचे सचिव सुरेश गांधी यांनी दिली. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातून डॉ जयश्री पाटील, सौ. सुलोचना मोरे, श्रुती शंकर माळगी, डॉ. माधुरी पाटील, गोपालकृष्ण म. कालेकर यांनी यश संपादन केले. डॉ. माधूरी पाटील आपली डॉक्टर सेवा बजावत शालेय विद्यार्यांना विनामूल्य योगांचे मार्गदर्शन करतात.

      तसेच शाळा महाविघालयामध्ये युवक युवतीना वेगवेगळ्या विषयावर व्याख्यान व मार्गदर्शन करून प्रबोधन करतात. ग्रामीण भागात असूनही योगा सारख्या अवघड  पंच परीक्षेत उज्वल यश मिळवणाऱ्या डॉ. माधुर पाटील यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.

No comments:

Post a Comment