चंदगड तालुक्यातील विविध प्रकारचे १३०० दाखले तहसील कार्यालयात प्रलंबित, विद्यार्थ्यांचे होणार शैक्षणिक नुकसान - चंदगड लाईव्ह न्युज

01 July 2023

चंदगड तालुक्यातील विविध प्रकारचे १३०० दाखले तहसील कार्यालयात प्रलंबित, विद्यार्थ्यांचे होणार शैक्षणिक नुकसान

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
       सर्व्हर डाऊनमुळे चंदगड तालुक्यातील विद्यार्थी व पालकांचे विविध प्रकारचे १३०० पेक्षा अधिक दाखले प्रलंबित आहेत. शैक्षणिक वर्षात प्रवशासाठी, फि सवलतीसाठी वि्द्यार्थ्यांना शैक्षणिक कारणास्तव तहसील कार्यालयात सेतु करवी मागणी केलेले उत्पन्न, रहिवास, ईडब्ल्यूएस, नॉन क्रिमी लेअर, अल्पभुधारक, भुमिहीन, ३० % आरक्षण आदी दाखले मिळालेले नाहीत. विद्यार्थी व पालक यामुळे हवालदील झाले आहेत. शासनाने या प्रकरणी गंभीर दखल घेऊन दाखले सादर करण्यास मुदतवाढ द्यावी, अशी मागणी पालकवर्गातुन होत आहे. याबाबत अखिल भारतीय मराठा महासंघाने  बुधवारी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मुदतवाढ देण्यासंदर्भात मागणी केली आहे.


No comments:

Post a Comment