डुक्करवाडीच्या सुभाष तुर्केवाडकर याची प्रोग्राम इन मॅनेजमेंटसाठी निवड - चंदगड लाईव्ह न्युज

28 June 2023

डुक्करवाडीच्या सुभाष तुर्केवाडकर याची प्रोग्राम इन मॅनेजमेंटसाठी निवड

सुभाष गणपत तुर्केवाडकर

चंदगड / प्रतिनिधी
    डुक्करवाडी-रामपूर (ता. चंदगड) येथील सुभाष गणपत तुर्केवाडकर याने इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, बेंगळूर तर्फे घेण्यात आलेल्या देशपातळीवरील कॉमन ऍडमिशन टेस्टमध्ये सुभाषने ९० टक्के गुण मिळवत हे यश संपादन केले. त्याची इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, तिरुचिरापल्ली (तामिळनाडू) येथे पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्राम इन मॅनेजमेंटसाठी निवड झाली आहे. 
        सुभाष याचे प्राथमिक शिक्षण मराठी विद्यामंदिर व माध्यमिक शिक्षण बी डी विद्यालय, डुक्करवाडी (रामपूर), (ता. चंदगड) व उच्च माध्यमिक शिक्षण एम. आर. कॉलेज, गडहिंग्लज येथून झाले. बारावीनंतर अभियांत्रिकी पदवीचे शिक्षण तळसंदे येथील डॉ. डी. वाय. पाटील कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयातून झाले आहे. विशेष म्हणजे घरची प्रतिकूल परिस्थिती असतानाही सुभाष याने आपले सर्व शिक्षण चांगल्या पद्धतीने पूर्ण केले. सुभाष सध्या पुणे येथे वॉटर या एन जी ओ मध्ये नोकरी करत आहे. डॉ. डी. वाय. पाटील महाविद्यालयात शिकत असतानाच स्पर्धा परीक्षेची तयारी चालू केली होती व याचा फायदा झाल्याचे त्याने सांगितले. या प्रसंगी आपल्याला मार्गदर्शन करणाऱ्या व आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणाऱ्या सर्वांप्रती आभार व्यक्त केले. हे यश सुभाषचे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना प्रेरणादायी असल्याचे इतर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. बी. पाटील यांनी सांगितले. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, विश्वस्त आ.ऋतुराज संजय पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता  महाविद्यालयाचे सर्व शिक्षक यांनी अभिनंदन केले.

No comments:

Post a Comment