घुल्लेवाडी फाटा- मलतवाडी रस्त्याला पॅचवर्क वाहनधारकांना तात्पुरता दिलासा - चंदगड लाईव्ह न्युज

05 June 2023

घुल्लेवाडी फाटा- मलतवाडी रस्त्याला पॅचवर्क वाहनधारकांना तात्पुरता दिलासा

घुल्लेवाडी फाटा ते मलतवाडी रस्त्यातील खड्ड्यांत झालेले डांबरी पॅचवर्क

चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

         घुल्लेवाडी फाटा ते मलतवाडी (ता. चंदगड) रस्त्याची खड्ड्यांमुळे अक्षरशः चाळण झाली होती. गेले अनेक महिने या मार्गावरील प्रवासी व वाहनधारक त्रस्त झाले होते. या प्रश्नी मनसे ने आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर नुकतेच या रस्त्यावर संबंधित बांधकाम विभागाने डांबरी पॅचवर्क केल्याने वाहनधारक व प्रवासी वर्गाला तात्पुरता दिलासा मिळाला आहे. याबाबतचे वृत्त चंदगड तालुक्याचे मुखपत्र चंदगड लाईव्ह तथा सी. एल. न्यूज मधून प्रसिद्ध करण्यात आले होते.

      तालुक्याच्या पूर्व भागातील हा अत्यंत महत्त्वाचा रस्ता असून कोवाड, कालकुंद्री, राजगोळी ते दड्डी परिसराला मलतवाडी, सांबरे, नेसरी, लकीकट्टे, अडकूर, अमरोळी भागाशी जोडणारा हा अत्यंत महत्त्वाचा व वर्दळीचा मार्ग आहे. मलतवाडी ते सांबरे तसेच मलतवाडी ते पोरेवाडी, मुगळी, अमरोळी हे दोन रस्ते झाल्यामुळे घुल्लेवाडी फाटा ते मलतवाडी रस्त्याला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. या अर्धा ते १ किमी रस्त्याची खड्ड्यांमुळे दूरवस्था झाली होती. अपघात टाळण्यासाठी बांधकाम विभागाने पावसाळापूर्वी दुरुस्ती करावी. अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष विवेक पाटील, तालुका सरचिटणीस तुकाराम पाटील यांच्यासह संभाजी मनवाडकर, विनायक वांद्रे, अमर प्रधान, अरुण कित्तुरकर, चेतन वांद्रे, भावकू नाईक, बाळाजी गिरी आदी पदाधिकारी व मनसैनिकांनी दिला होता. आत्ता रस्त्यावर त्याच्यावर झाल्यामुळे खड्ड्यांमुळे त्रस्त झालेल्या वाहनधारक व प्रवाशांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

No comments:

Post a Comment