नागरिकांनी पुराच्या पाण्यातून प्रवास करुन धोका पत्करू नये - स. पो. नि. संदिप कांबळे - चंदगड लाईव्ह न्युज

20 July 2023

नागरिकांनी पुराच्या पाण्यातून प्रवास करुन धोका पत्करू नये - स. पो. नि. संदिप कांबळे

हडलगे बंधाऱ्यावर पुरा मध्ये हुल्लडबाजी करणाऱ्या युवकांना समज देताना सहाय्यक पोलिस निरिक्षक संदिप कांबळे

तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

       सध्या नेसरी (ता गडहिंग्लज) परिसरात मुसळधार पाऊस चालू असल्याने जवळून वाहणाऱ्या घटप्रभा नदिला मोठा पूर आला आहे. ओढ्यानाही पुर आल्याने अशा धोकादायक परिस्थितीतून नागरिकांनी प्रवास करू नये. पुराच्या पाण्याचा धोका पत्करु नये असे आवाहन नेसरी पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संदिप कांबळे यांनी चंदगड लाईव्ह न्यूज प्रतिनिधीशी  बोलताना केले.

    आज सपोनि संदिप कांबळे यांनी नेसरी जवळून वाहणाऱ्या घटप्रभा नदिवरील हडलगे -तारेवाडी येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याला भेट देवून पूर परिस्थितीची पहाणी केली. यावेळी बंधार्‍यावर आलेल्या पाण्यामध्ये हडलगे येथील काही युवक मौज मजा करत होते. त्या युवकांना तात्काळ समज देण्यात आली. तसेच जुन्या बंधाऱ्याकडे जाणारा रस्ता दगड ठेवून बंद करण्यात आला.

     यावेळी बोलताना सपोनि संदिप कांबळे म्हणाले, ``जोरदार पाऊस चालू असल्याने शक्यतो नागरिकांनी घरामध्ये  थांबावे. बाहेर जाण्याची वेळ आलीच तर पुराच्या पाण्यातून चालत अगर वाहन घालण्याचे नुसते धाडस करू नये. ते जिवावर बेतू शकते. या नैसर्गिक आपत्तीमध्ये शक्यतो घरी सुरक्षित राहून प्रशासनाला व पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहनही यावेळी बोलताना त्यानी केले. यावेळी पो. हे. कॉ. दिपक माने, कालिंदर  तडवी  उपस्थित होते.

No comments:

Post a Comment