'संत गजानन' इंजिनिअरच्या १५४ विद्यार्थ्यांची कॅम्पस प्लेसमेंट मधून निवड - चंदगड लाईव्ह न्युज

20 July 2023

'संत गजानन' इंजिनिअरच्या १५४ विद्यार्थ्यांची कॅम्पस प्लेसमेंट मधून निवड

संत गजानन इंजिनिअर महाविद्यालयात टाटा अॉटोकॉम कंपनीत निवड झालेल्या विद्यार्थ्यां समवेत प्राचार्य डॉ. एस. एच. सावंत शेजारी शिक्षक

महागाव / सी. एल. वृत्तसेवा

      महागाव (ता. गडहिंग्लज)येथील संत गजानन महाराज इंजिनिअरींग महाविद्यालयातील शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मधील अंतिम वर्षाच्या १५४ विद्यार्थ्यांना कॅम्पस प्लेसमेंट मधून नामांकित राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपनीत नोकऱ्या मिळाल्या आहेत. परीक्षेचा निकाल लागण्याआधीच विद्यार्थ्यांना नोकरीची संधी उपलब्ध झाल्याने विद्यार्थी व पालक वर्गातून आनंद व्यक्त होत आहे.

     महाविद्यालयामध्ये मिळालेला नॕक नामांकन , गुणवत्ता व इतर बाबीचा विचार घेऊन राष्ट्रीय व बहुराष्ट्रीय कंपन्या थेट कॅम्पस मध्ये येऊन  विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा, समूह चर्चा आणि मुलाखत घेऊन निवडीचे पत्र दिले प्रमुख कंपन्यामध्ये टीसीएस,टाटा अॉटोकॉम,ॲक्टिसिस्टीम, क्यू फायटर,गोल्ड प्लस,मेगा इंजिनिअर मधून सर्वाधीक विद्यार्थ्यांची निवड झाली निवड झालेल्या विद्यार्थी व पालकांनी आनंदोत्सव साजरा केला.

      संस्थाध्यक्ष ॲड.आण्णासाहेब चव्हाण यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत म्हणाले "विद्यार्थी जेव्हा येथे प्रथम अथवा थेट तृतीय वर्षात प्रवेश घेतात तेव्हा प्लेसमेंटच्या माध्यमातून हमखास नोकरी मिळेल अशी अपेक्षा ठेवतात. पालकांनीही हीच अपेक्षा असते त्यांची अपेक्षा पुर्ण करीत ग्रामीण विद्यार्थीना नामांकित कंपन्यांमध्ये नोकऱ्या मिळवून देण्यात आम्ही यशस्वी होत आहोत. यावेळी विस्वस्थ डॉ. संजय चव्हाण,डॉ.यशवंत चव्हाण,सचिव ॲड.बाळासाहेब चव्हाण, प्राचार्य डॉ.एस.एच. सावंत व शिक्षक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment