हलकर्णी प्राथमिक शाळेतील १७५ विद्यार्थांना शैक्षणिक साहित्य वाटप, शाळेला ११ हजाराची देणगी प्रदान, राजेश कुलकर्णी यांचा स्त्युत्य उपक्रम - चंदगड लाईव्ह न्युज

21 July 2023

हलकर्णी प्राथमिक शाळेतील १७५ विद्यार्थांना शैक्षणिक साहित्य वाटप, शाळेला ११ हजाराची देणगी प्रदान, राजेश कुलकर्णी यांचा स्त्युत्य उपक्रम

 


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

        हलकर्णी (ता. चंदगड) येथील केंद्रीय प्राथमिक शाळेत कै. सुनिल शामराव कुलकर्णी व कै. अमितेश विनायक दिवानजी यांच्या स्मरणार्थ पौरोहित्य राजेश कुलकर्णी यांच्या हस्ते १७५ विद्यार्थ्यांना वह्या व पेन वाटप करण्यात आले. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष एकनाथ कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली व उपाध्यक्ष अमोल हरारे यांच्या प्रमुख उपस्थितित कार्यक्रमात वाटप करण्यात आले.

     राजेश कुलकर्णी यांच्या पुतण्याचे अकाली निधन झाले. त्याचे दुःख कुरवाळत न बसता शाळेतील विद्यार्थांना वही व पेन वाटप करून त्याच्या आत्म्याला चिरशांती लाभावी. साठी दरवर्षी केंद्र शाळेतील सर्व मुलांना वही व पेन तसेच इयत्ता ७ वीच्या पहिल्या तीन क्रमांकाना १००१, ७५०, ५०० रोख रक्कम व स्मृतिचिन्ह देत आहेत. तसेच या कार्यक्रमाचे औचित्य साधून शाळेला अकरा हजार १११ रुपयाची देणगी व स्वयंपाक घराला एक स्टील स्टँड भेट दिले.

       अध्यक्ष एकनाथ कांबळे यांनी राजेश कुलकर्णी महाराजांनी चालू केलेल्या उपक्रमाचे कौतूक केले व विशेष आभार मानले अश्या प्रकारची मदत करायला ग्रामस्थांनी पुढे यावे असे आवाहन केले.

    यावेळी राजू कडूकर, तुकाराम कांबळे,सतिश जाधव, तुकाराम नाईक, मुख्याध्यापक अशोक बेनके  तसेच शाळा व्यवस्थापन सदस्य, पालक, विद्यार्थी, शिक्षक मनोहर पाटील, रमेश गावडे, दुलाजी कौंदलकर, श्रीमती कमल तरवाळ आदी उपस्थित होते. सुत्रसंचालन अर्जुन चाळुचे यांनी केले व आभार जोतिबा बामणे यांनी मानले.

No comments:

Post a Comment