पी. एम. किसान योजनेचा १४ वा हप्ता या दिवशी येणार ? - चंदगड लाईव्ह न्युज

21 July 2023

पी. एम. किसान योजनेचा १४ वा हप्ता या दिवशी येणार ?





चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

        प्रधानमंत्री पी. एम. किसान योजनेचा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची प्रतिक्षा संपली आहे. देशाचे पंतप्रधान नरेद्र मोदी डीबीटीच्या माध्यमातून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा १४ वा हप्ता २७ जुलै २०२३ रोजी सीकर (राजस्थान) येथून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. याबाबतची अधिकृत माहिती पी. एस. किसानच्या अधिकृत वेबसाईटवर प्रसिध्द करण्यात आली आहे. 

     ज्या पात्र शेतकऱ्यांनी पी. एम. किसान योजनेच्या लाभासाठी अद्याप केवाईशी केलेली नाही. अशा शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी केवाईशी करावी. अन्यथा या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी आपल्याला अडचण होवू शकते. आपले बँक खाते आधारशी संलग्न आहे की नाही. याचीही खात्री करुन घ्यावी. 

                           पी. एम. किसान योजना

पी. एम. किसान ही १०० टक्के केंद्र शासनाची योजना असून या योजनेस भारत सरकारचे १००% अर्थसहाय्य आहे.

या योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना प्रती वर्ष रू. ६०००/- उत्पन्न पाठबळ म्हणून लाभ देण्यात  येतो.

या योजनेसाठी कुटुंबाची व्याख्या म्हणजे पती, पत्नी व त्यांची अल्पवयीन (१८ वर्षाखालील) मुले अशी आहे.

राज्य शासन आणि केंद्र शासित प्रदेश हे अशा शेतकरी कुटुंबांची ओळख/पडताळणी करतील जे या योजनेंतर्गत विहित निकषांप्रमाणे पात्र असतील.

या योजनेचा लाभ लाभार्थ्यांच्या बॅंक खात्यात थेट लाभ हस्तांतरणाद्वारे करण्यात येते. 

या योजनेसाठी अनेक अपात्रतेच्या अटी आहेत.

                             योजनेचे अपात्रतेचे निकष

संवैधानिक पद धारण करणारे/ केलेले आजी व माजी व्यक्ती.

आजी/माजी मंत्री/राज्यमंत्री, आजी/ माजी खासदार/राज्यसभा सदस्य, आजी/माजी विधानसभा/विधान परीषद सदस्य, आजी/माजी महानगरपालीकेचे महापौर, आजी/माजी जिल्हा परीषदेचे अध्यक्ष.

केंद्र व राज्य शासनाचे सर्व कार्यरत व निवृत्त अधिकारी/ कर्मचारी, शासन अंगीकृत निमशासकीय संस्थांच्या अखत्यारीतील कार्यालयांमधील आणि स्वायत्त संस्थांचे सर्व अधिकारी/कर्मचारी तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नियमीत अधिकारी/कर्मचारी.

चतुर्थश्रेणी / गट ड वर्ग कर्मचारी वगळून

सर्व निवृत्तीवेतनधारक व्यक्ती ज्यांचे मासिक निवृत्तीवेतन रू. १०,०००/- किंवा त्यापेक्षा जास्त आहे

चतुर्थश्रेणी / गट ड वर्ग कर्मचारी वगळून

मागील वर्षात आयकर भरलेल्या सर्व व्यक्ती.

No comments:

Post a Comment