कोल्हापूर जिल्ह्यातील ७६ गावांना भूस्खलनाचा धोका, चंदगड तालुक्यातील गंधर्वगडाचा समावेश - चंदगड लाईव्ह न्युज

21 July 2023

कोल्हापूर जिल्ह्यातील ७६ गावांना भूस्खलनाचा धोका, चंदगड तालुक्यातील गंधर्वगडाचा समावेश

 

 भूस्खलनाच्या यादीत धोकादायक असलेले गंधर्वगड -केरवडे गाव.

एस. के. पाटील - तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

         इर्शालगडच्या दुर्घटनेनंतर कोल्हापूर प्रशासन अलर्ट मोडवर आले असून जिल्हातील ७६ गावांना भूस्खलनाचा धोका असल्याची यादी जाहिर करण्यात आली आहे. राधानगरीसह शाहूवाडीत अशा गावांची संख्या मोठी आहे. तर चंदगड तालूक्यातील  गंधर्वगड हे एकच गाव यामध्ये समाविष्ठ आहे.

      पावसाळा सुरू झाला की अशा धोकादायक गावावर भूस्खलनाचा धोका निर्माण होतो. जिल्ह्यातील शाहूवाडी, पन्हाळा, गगनबावडा, गडहिंग्लज, भुदरगड, कागल, आजरा, चंदगड, करवीर या १० तालूक्या मध्ये अशा धोकादायक गावांची यादी शासनाने तयार केली आहे. शेजारच्या गडहिंग्लज तालूक्यात चिंचेवाडी व सामनगड ही दोन गावे यामध्ये समाविष्ठ आहेत. तर चंदगड तालूक्यात गंधर्वगडचा समावेश आहे. या गडावर तसेच गडाच्या तटबंदीच्या पायथ्याला केरवडे गाव वसले आहे येथील दोन्ही गावाना धोका आहे. 

         तसेच निटूर गावच्या पूर्वेला नरसिंह टेकडीच्या पायथ्याला टेकडी तोडून काही घरांचे बांधकाम झाले आहे. या ठिकाणी तीन वर्षापूर्वी काही प्रमाणात भूस्खलन झाले होते. येथील काही घरानाही भूस्खलनाचा धोका आहे. आज गंधर्वगड येथे काही अधिकात्यांनी भेट देवून पाहणी केली.  चंदगड तालूक्यातही अशी अनेक गावे धोकादायक आहेत. याचा शोध शासनाने घेणे गरजेचे आहे.

No comments:

Post a Comment