निट्टूर व ढोलगरवाडी जवळील ओढ्यावरील पूलांना तीन कोटी मंजूर - आमदार राजेश पाटील - चंदगड लाईव्ह न्युज

24 July 2023

निट्टूर व ढोलगरवाडी जवळील ओढ्यावरील पूलांना तीन कोटी मंजूर - आमदार राजेश पाटील

 

निट्टूर ओढ्यावर आलेले पाणी

तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

       पावसाळ्यामध्ये वारंवार पाणी आल्याने वाहतूक ठप्प होणाऱ्या ढोलगरवाडी - कडलगे  व निट्टूर - घुल्लेवाडी ओढ्यावरील पूलांच्या बांधकामासाठी ३ कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून पावसाळा संपल्यानंतर या पूलांचे काम चालू करण्यात येणार असल्याची माहिती आमदार राजेश पाटील यांनी दिली.

निधी मंजूर झालेले पत्र

     निटूर ओढ्यावर पाणी आल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प होती यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध झाले होते. यानंतर लगेचच आमदार राजेश पाटील यानी यासंदर्भात माहिती दिली. निटूर -घुल्लेवाडी दरम्यान असणाऱ्या ओढ्यावरील पुलासाठी १ कोटी २५ लाख रुपये तर कडलगे -

ढोलगरवाडी दरम्यान असणाऱ्या ओढ्या वरील पूलासाठी १ कोटी ७५ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. यासंदर्भातील मंजूरी मार्चच्या अर्थसंकल्पात केली असून पावसाळ्यानंतर लगेच या कामाची सुरवात होईल अशी माहिती आमदार राजेश पाटील यांनी दिली आहे.


 महापूर काळात नागरिकांनी सतर्क राहवे

       सध्या चंदगड तालूक्यात जोरदार पाऊस चालू असल्याने ताम्रपर्णी, घटप्रभा व हिरण्यकेशी नद्यांना मोठा महापूर आला आहे. अनेक बंधारे पाण्याखाली गेले आहेत. तर ठिकठिकाणी ओढ्यानाही प्रचंड पाणी येत आहे.अशा परिस्थितीत  नागरिकांनी व प्रवाशांनी या पुराच्या पाण्यातून प्रवास करण्याचा प्रयत्न करु नये. प्रशासनाच्या सुचनांचे पालन करुन प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन आमदार राजेश पाटील चंदगड आजरा व गडहिंग्लज तालुक्यातील नागरिकांना केले.

No comments:

Post a Comment