चंदगड पोलिसांची मोठी कारवाई : गोवा बनावटीच्या दारुसह ५ लाख ३७ हजारांचा मुद्देमाल जप्त, कोठे केली ही कारवाई, वाचा........... - चंदगड लाईव्ह न्युज

24 July 2023

चंदगड पोलिसांची मोठी कारवाई : गोवा बनावटीच्या दारुसह ५ लाख ३७ हजारांचा मुद्देमाल जप्त, कोठे केली ही कारवाई, वाचा...........

ताब्यात घेतलेल्या व्यक्तीसमवेत कारवाईमध्ये सहभागी पोलिस टीम.

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

        देवरवाडी (ता. चंदगड) येथील देवरवाडी ते महिपाळगडाकडे जाणाऱ्या रोवडर रविवारी रात्री १२ वाजून १० मिनिटांच्या सुमारास चंदगड पोलिसांनी  सापळा रचून २ लाख ३२ हजार ४८० रुपयांची दारू व ३ लाख ५ हजार रुपये किमतीची महिंद्रा स्कार्पिओ चार चाकी गाडी असा एकूण ५ लाख ३७ हजार ४८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी सतीश यलाप्पा बुंद्री (वय-25, रा. लक्ष्मी गल्ली, बुंद्रीअनुर, ता. जि. बेळगाव) याला ताब्यात घेतले आहे. 

       यासंदर्भात पोलिसांतून मिळालेली माहीती अशी की, सतीश यल्लाप्पा बुद्रि हा व्यक्ती महाराष्ट्र राज्याचा कर चुकून विनापरवाना बेकायदेशीर रित्या गोवा बनावटीची २ लाख ३२ हजार ४८० रुपये किमतीची दारू व ३ लाख ५ हजार रुपये किमतीच्या महिंद्रा स्कार्पिओ या चार चाकी वाहनातून वाहतुक करत असताना एकूण ५ लाख ३७ हजार ४८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी चंदगड पोलिसात सतीश याच्यावर गुन्हा नोंद झाला असून अटक करण्यात आली आहे. 

       सतीश याला आज चंदगड येथील न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलिस कोठडी देण्यात आली आहे. घटनेची नोंद चंदगड पोलिसात झाली असून सहायक पोलीस निरीक्षक ए. एम. मुल्ला तपास करत आहेत.

No comments:

Post a Comment