माडखोलकर महाविद्यालयाचा मंगळवारी २६ वा वर्धापनदिन कार्यक्रम, युवराज संभाजीराजे यांची प्रमुख उपस्थिती - चंदगड लाईव्ह न्युज

28 July 2023

माडखोलकर महाविद्यालयाचा मंगळवारी २६ वा वर्धापनदिन कार्यक्रम, युवराज संभाजीराजे यांची प्रमुख उपस्थिती

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

         चंदगड येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयाचा २६ वा वर्धापन दिन मंगळवार दि. १ ऑगस्ट २०२३  रोजी सकाळी ११ वाजता संपन्न होणार असल्याची माहीती प्राचार्य डाॅ. पी. आर. पाटील यांनी दिली. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून माजी खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती उपस्थित राहणार आहेत. यावेळी नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत, गुणगौरव सोहळा, स्मरणिका प्रकाशन आदी कार्यक्रम होणार आहेत. या कार्यक्रमाला आजी-माजी विद्यार्थी, पालक, हितचिंतक, देणगीदार या सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. पाटील यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment