तेऊरवाडी येथील एन. व्ही. पाटील यांची शिक्षण विस्तार अधिकारीपदी निवड - चंदगड लाईव्ह न्युज

29 July 2023

तेऊरवाडी येथील एन. व्ही. पाटील यांची शिक्षण विस्तार अधिकारीपदी निवड

 एन. व्ही. पाटील
तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

          तेऊरवाडी (ता. चंदगड) येथील प्राथमिक शिक्षक एन. व्ही. पाटील यांची शिरोळ तालुका शिक्षण विस्तार अधिकारीपदी निवड झाली.

   प्रतिकूल परिस्थितित शिक्षण पूर्ण करून शिक्षक म्हणून नोकरीस लागल्यानंतर शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ठ अध्यापक म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी सेवा केली. केंद्रिय प्राथमिक शाळा माणंगावचे मुख्याध्यापक व माणगांव केंद्राचे केंद्रप्रमुख म्हणून अतिशय उत्तमरित्या श्री. पाटील यांनी काम पार पाडले. तसेच प्राथमिक शिक्षक  सहकारी पतसंस्थेचे संचालक आणि शिक्षक समिती शाखा चंदगडचे सरचिटणिस म्हणूनही ते जबाबदारी पार पाडत आहेत. अध्यापना बरोबरच उत्कृष्ठ सूत्रसंचालक व व्हालीबॉल  खेळाडू म्हणूनही  श्री. पाटील सर्वांना परिचित आहेत. शिक्षणाबरोबर समाज कार्यातही अग्रेसर असणाऱ्या अशा एका हरहुन्नरी एन. व्ही. पाटील यांची शिक्षण विस्तार अधिकारीपदी निवड झाल्याने अभिनंदन होत आहे. 

No comments:

Post a Comment