कालकुंद्री व परिसरात भावपूर्ण वातावरणात ताबूत विसर्जन - चंदगड लाईव्ह न्युज

29 July 2023

कालकुंद्री व परिसरात भावपूर्ण वातावरणात ताबूत विसर्जन

कालकुंद्री येथे ताबूत विसर्जन मिरवणुकीत सहभागी झालेले मुस्लिम बांधव.

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

          कालकुंद्री (ता. चंदगड) येथे मुस्लिम बांधवांचा मोहरम सण उत्साहात साजरा झाला. अखेरच्या दिवशी भावपूर्ण वातावरणात ताबूत विसर्जन करण्यात आले. यावेळी मुस्लिम बांधवांसोबत गावातील विविध जाती धर्मातील लोक सहभागी झाले होते. मोहरम निमित्त गाव पाळक ठेवून सर्व कामे बंद ठेवण्यात आली होती. 

             मोहरम निमित्त  कालकुंद्री येथील अनेक मुस्लिम बांधवांनी उपवास ठेवला होता. ताबूत विसर्जन दिवशी सर्व मुस्लिम बांधवांनी भावपूर्ण वातावरणात मिरवणुकीने ताम्रपर्णी नदी घाटावर ताबूतचे विसर्जन केले. यात मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव सहभागी झाले होते. परिसरातील कोवाड, कुदनूर, तळगुळी, दिंडलकोप या ठिकाणीही मोहरम सण उत्साहात साजरा करण्यात आला.

1 comment:

जोशी गुरुजी said...

कालकुंद्री परिसरात ताबुत विसर्जन हे सामाजिक एकोपा असल्याचे प्रतिक आहे.

Post a Comment