सौरभ पाटील विनायक हवालदार |
चंदगड येथील रामदेव क्रीडा व सांस्कृतिक गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी सौरभ पाटील व उपाध्यक्षपदी विनायक हवालदार यांची बिनविरोध निवड करण्यात आली. मंडळाच्या वार्षिक बैठकीत ही निवड करण्यात आली. अध्यक्षस्थानी संजय चंदगडकर होते. संजय खासनिस यांची प्रमुख उपस्थिती होती.
या बैठकीत २०२३ च्या गणेशोत्सवाचे नियोजन करण्यात आले. यावेळी नंदकिशोर पिळणकर (सचिव) परशराम तोरगल (खजिनदार) यासह संदीप कोकरेकर, रमेश सदावर, अभिजित देसाई, ॠषीकेश ओऊळकर, विलास सुतार, शैलेश सुतार, विनायक मुळीक, राहूल चौगुले, देवदत्त कुलकर्णी, राजेंद्र सुतार, अभिजित कुलकर्णी, प्रसाद चौगुले, नागेश सुतार, राज पाटील, सागर हवालदार, यश चौगुले, विक्रांत सुतार, अश्विन कोदाळकर यांची सदस्यपदी निवड करण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment